मू. जे. महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचा-यांचे बेमुदत काम बंद आंदोलन (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मू. जे. महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यासाठी दि. 21 डिसेंबर 2021 पासून बेमुदत काम बंद आंदोलन शासनाच्या कोव्हीड- 19 मार्गदर्शनानुसार करण्यात आले आहे. संपात महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान विविध घोषणांनी महाविद्यालय परिसर दणाणत आहे. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार या संपाचे आयोजन करण्यात आले आहे.

थेट प्रक्षेपण…..👇

शिक्षकेतर कर्मचा-यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दि. 7 डिसेंबर 2018 तसेच दि. 16 फेब्रुवारी 2019 रोजी तसेच कालबद्ध पदोन्नती योजना या शासनाने धोरणात्मक निर्णय म्हणून रद्द केलेल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी 7 व्या वेतन आयोगापासून तसेच सेवानिवृत्त झालेले कर्मचा-यांना अजूनपर्यंत पेन्शन योजना लागू झालेली नाही. त्यामुळे या शिक्षकेतर कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सदर बाब ही गंभीर असल्याकारणाने शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

आंदोलनात अध्यक्ष श्री. टुलाराम भारूळे, उपाध्यक्ष नितीन पाटील, महाविद्यालयाचे कुलसचिव डॉ. जगदीप बोरसे, सुभाष तळेले, साधू तागड, दत्तात्रय कापुरे, विजय सोनवणे आणि इतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी आंदोलन यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. तसेच स्थानिक अध्यक्षांच्या आवाहनानुसार सर्व शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

या आंदोलनास डॉ. चंद्रमणी लभाणे, विभागीय अध्यक्ष तथा राज्यउपाध्यक्ष बहुजन समाज, वचित बहुजन आघाडी मा.शि.शि.क. संघटना,  आर. आर. अत्तरदे, केंद्रीय प्रतिनिधी, एन. मुक्टो तसेच प्रा. आर. एम. राठोड, अध्यक्ष, स्थानिक एन. मुक्टो. संघटना, मू. जे. महाविद्यालय यांचा पाठींबा लाभला.

Leave A Reply

Your email address will not be published.