मुख्य जलवाहिनी फुटल्याने एक दिवसाचा पाणीसाठा गेला वाहून

0

जळगाव :- जलवाहिनी फुटण्याचे सत्र सुरूच आहे वाघूर पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरासाठी उमाळा जलशुद्धीकरण केंद्रापासून शहरात टाकण्यात आलेली मुख्य जलवाहिनी फुटण्याचे सत्र सुरूच आहे. पंधरा दिवसांपूर्वी दोन मोठ्या गळत्यांचे काम पूर्ण केल्यानंतर जेमतेम पाणीपुरवठ्याचे रोटेशन नियमित झाले होत. त्यात पुन्हा शहरावर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. मंगळवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास मानराज मोटर्स व राहुल ट्रॅक्टर्ससमोर १५०० मिमीची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहराला एक दिवस पुरेल एवढा पाणीसाठा नाल्यात वाहून गेला. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून मंगळवारी न झालेला पाणीपुरवठा आज बुधवारी होणार आहे.

मंगळवारी अजिंठा रोडवरील मानराज माेटर्स व राहुल ट्रॅक्टर्ससमाेर मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे शहराला एक दिवस पुरेल एवढा पाणीसाठा नाल्यात वाहून गेला. मनपाने मंगळवारी ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता त्या भागातील पाणीपुरवठा रद्द केला. त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून मनपाने कामाला सुरुवात केली होती. या कामाला २० तासाहून अधिक कालावधी लागणार असल्याची मनापा प्रशासनाकडून देण्यात आली असून यामुळे शहरातील पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.