आठवडाभरापूर्वीच विवाह झालेल्या तरुणाचा अपघातात मृत्यू

0

जळगाव |  चुलत बहिणीचा लग्नाहून परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला भरधाव बॅण्डच्या वाहनाने जाेरदार धडक दिली. या भीषण अपघात सात दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शिरसाेली रस्त्यावरील श्रीकृष्ण लाॅनजवळ मंगळवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली.

कुसुबा येथील महेंद्र शिवलाल पाटील (वय ३२) याच्या चुलत बहिणीचे वावडदा येथील ग्रामपंचायत सदस्य बापू पाटील यांच्याकडे मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता गाेरज मुहूर्तावर लग्न होत. त्यामुळे महेंद्र आणि त्याचा मित्र सागर हे दोघे एमएच १९. एके.२६८१ क्रमांकाच्या मोटारसायकलीने लग्नाला गेले होते. सायंकाळी लग्न सोहळा आटोपून दोघेही घरच्या मार्गाला निघाले. शिरसाेली रस्त्यावरील श्रीकृष्ण लाॅनजवळ मंगळवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास  त्यांच्या मोटारसायकलीला समोरून भरधाव बॅण्डच्या वाहनाने  जोरदार धडक दिली. या अपघातात महेंद्र यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला जबर मार बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सागर हा गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी केला अाक्राेश 

महेंद्र हा कुसुंबा गावात दुधाचा व्यवसाय करीत होता. त्याचा गेल्या मंगळवारी १४ मे राेजी विवाह झाला असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच त्याच्या कुटुंबीयांनी रुग्णलयात धाव घेऊन आक्रोश केला. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, मोठा भाऊ, वहिणी असा परिवार आहे. तर जखमी सागर हा चटईच्या कंपनीत कामाला असून त्याच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.