अभ्यासासाठी नोट्स न मिळाल्यामुळे तरुणीची विष घेऊन आत्महत्या

0

जळगाव | अभ्यासासाठी वेळेत नोट्स न मिळाल्यामुळे एका उच्चशिक्षित तरुणीने रॅट किल (उंदीर मारण्याचे औषध) खाऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली. शुभांगी सीताराम सोनवणे (वय २५, रा. साळशिंगी, ता. बोदवड) असे मृत तरुणीचे नाव असून या घटनेमुळे तिच्या कुटंुबीयांना जबर धक्का बसला.

शुभांगी ही साळशिंगी गावात एका शाळेत कंत्राटी पद्धतीने इंग्रजी शिकवण्याचे काम करीत होती. तसेच एमएचे (इंग्रजी) शिक्षणही घेत होती. वडिलांचे निधन झालेले असल्यामुळे एक बहीण व आई यांची जबाबदारी तिच्या खांद्यावर होती. अशात अभ्यासासाठी तिला वेळेत नोट्स न मिळाल्याने तिने १८ मे रोजी घरात उंदीर मारण्याचे औषध खाल्ले होते. यानंतर तिची प्रकृती खराब झाल्यामुळे कुटंुबीयांनी तिला जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी ८.२० वाजता तिचा मृत्यू झाला. यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह कुटंुबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात  क्रमांकाने नोद करून बोदवड पोलीस ठाण्यात वर्ग केली.

Leave A Reply

Your email address will not be published.