मुख्यमंत्र्याच्या आश्वासनानंतर गाळेधारकांनी आंदोलन घेतले मागे

0

जळगाव ;- महापालिकेने गाळेधारकांविरुद्ध अवाजवी भाडे, दंडात्मक रक्कम तसेच ई-लिलावाच्या कार्यवाही विराेधात सुमारे ५ हजारावर गाळेधारकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी गेल्या २० मार्चपासून व्यापारी संकुले बेमुदत बंद ठेऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला होता . यासाठी गाळेधारकांनी महामूक मोर्चा ,मानवी साखळी, मुंडन उपोषण असे विविध आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले होते . मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाळेधारकांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले होते . त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या गाळेधारकांना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्रयांच्यावतीने आश्वासन देऊन उपोषणकर्त्या गाळेधारकांना लिंबू पाणी देऊन उपोषण मागे घेतले . यामुळे गेल्या चार दिवसांपासून ठप्प असलेल्या १८ व्यापारी संकुले उघडणार असून दैनंदिन व्यवहार सुरु होणार आहे . यावेळी सर्व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले कि . गाळेधारकांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील , माजी मंत्री एकनाथराव खडसे , आ. राजूमामा भोळे ,आ. चंदुभाई पटेल व इतर आमदार खासदारांनी भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले . आज सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यानी फोन करून गाळेधारकांशी चर्चा करून आंदोलन स्थगित करण्याचे सांगितले होते . त्यानुसार जिल्हाधिकाऱयांनी उपोषणस्थळी गाळेधारकांची भेट घेऊन आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले . या आवाहनाला प्रतिसाद देत गाळेधारकांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले . यावेळी जिल्हाधिकाऱयांनी गाळेधारकांना लिंबू शरबत देऊन उपोषण सोडविले . यावेळी गाळेधारक संघटनेचे डॉ.शांताराम सोनवणे, हिरानंद मंधवाणी, प्रेमचंद समदाणी, रमेश मताणी, राजकुमार आडवाणी, तेजस देपुरा, युवराज पाटील,प्रदीप जैन यांच्यासह विविध व्यापारी संकुलातील गाळेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.