प्रशांत पटले ठरला श्रमसंस्कारातील उत्कृष्ट स्वयंसेवक

0

जळगाव दि. १६-

ठाणे जिल्ह्यातील म्हस्कळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत झालेल्या श्रमसंस्कार शिबीरात डॉ. उल्हास पाटील कृषी व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रशांत पटले यास उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गौरविण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील म्हस्कळ येथे श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात डॉ. उल्हास पाटील कृषी आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रशांत पटले, सचिन पडवळ, शिवाजी पतंगे, नागेश कंदले, अविनाश काळे, यांची निवड झाली. या शिबीरात विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रशांत पटले हा विद्यार्थी उत्कृष्ट स्वयंसेवक ठरला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एम.पाटील, डॉ. ए.पी.चौधरी, अतुल बोंडे, कार्यक्रम अधिकारी, एन.ए.पाटील, प्रा. बी.बी. मुंढे यांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.