मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मेहुणी करांडे अपघातात जखमी

0

शिर्डी येथून साईबाबा यांचे दर्शन करून परतताना झालेल्या अपघातात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हनी वीणा करांडे जखमी झाल्या.

चालकाला डुलकी लागल्याने पांगरी गावाजवळ मोटार एका लहान पुलावरून गाडी खाली कोसळल्याने अपघात झाला.

करांडे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. सर्व जखमींना तातडीने नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, वीणा कारंडे यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजले, या अपघातात सध्या तरी 3 प्रवासी जखमी झाल्याचे समजते.

घटनास्थळी सिन्नर ग्रामीण पोलीस दाखल झाले आहे असे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.