मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहिल्यामुळेच माझी ही अवस्था; एकनाथ खडसे यांची खंत

0

जळगाव :- भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. चाळीस वर्षांच्या काळात अनेक मंत्रिपदे भूषविले. मात्र मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहिल्यामुळेच आपण कोणताही गुन्हा केलेला नसतानाही आपली अशी अवस्था झाली, अशी खंत त्यांनी सावदा येथील मुस्लीम समाजाच्या वतीने आयोजित ‘एक शाम नाथाभाऊ के नाम’ या मुशायराच्या कार्यक्रमात व्यक्त केली.

खडसे म्हणाले, आपण मंत्रीपदावर असतांना जाती धर्माच्या आधारावर नव्हे तर मुस्लीम समाज मागास असल्याने सामाजिक भावनेतून आपण नेहमी मुस्लीम समाजाच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले. इतकेच नव्हे तर मंत्रीपदावर असतांना मुस्लीम वख्त बोर्डाच्या महागड्या जमिनी ताब्यात घेत असताना त्यातील एका जमिनीवरील इमारत पाडण्याची नोटीस दिली होती, ती जमीन अंबानीची निघाली. यामुळे केलेली कारवाई आमच्याकडे काही जणांना आवडली नाही. त्यावेळी मोठा दबावही आला होता मात्र, आपण चांगल्या सामाजिक भावनेतून काम करण्याचा प्रयत्न केला होता, असेही ते म्हणाले.

या दरम्यान एका मुस्लीम कार्यकर्त्याने खडसे यांना ‘पुढील काळात आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळावे’ अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी खडसे यांनी यावर उत्तर देताना म्हणाले, मुख्यमंत्रीही होऊ, मात्र मुख्यमंत्रीपदाच स्वप्न पाहिल्यामुळेच आपली ही अवस्था झाली, असं सांगत खडसेंनी पुन्हा आपल्या पक्षाविरोधातील खदखद उघड केली. माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली गोपीनाथ मुंडे आणि मी राजकारणातील गुन्हेगारी व भ्रष्टाचारावरोधात लढा दिला. तरीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. ते खरे की खोटे, हे कोणी पहात नाही.

यांची होती उपस्थिती
यावेळी खासदार रक्षाताई खडसे, जि प उपाध्यक्ष नंदकिशोरजी महाजन, सावदा नगराध्यक्ष अनिताताई येवले, भुसावळ नगराध्यक्ष रमणभाऊ भोळे, फैजपुर नगराध्यक्ष महानंदाताई होले, बोदवड नगराध्यक्ष सईद बागवान, भाजप संघटन सर चिटणीस प्रा सुनीलजी नेवे, जि.प. सदस्य कैलासभाऊ सरोदे, मुन्नाजी तेली, अजयभाऊ भारंबे, प्रमोदभाऊ नेमाडे, पुरुषोत्तमजी नारखेडे, वसंतदादा पाटील, पंकजभाऊ येवले, सय्यद दादा असगर, सावदा उपनगराध्यक्ष शबानाताई तडवी, विश्वासभाऊ चौधरी, लिनाताई चौधरी, दुर्गादासभाऊ पाटील, श्रीकांतभाऊ महाजन, संतोषभाऊ वाघ, परागभाऊ पाटील, नेहाताई गाजरे, सतिष चौधरी, सुमित ब-हाटे, कमलेश भारंबे, गजू लोखंडे सर्व मुस्लिम पंच कमेटी आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.