भडगावचे नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा राजीनामा

0

भडगाव :- भडगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील यांनी आज जळगाव जिल्हाअधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्याने दिला.

राजेंद्र पाटील यांनी ३० ऑक्टोंबर २०१७ रोजी भडगाव नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली होती. यापूर्वी राष्ट्रवादीचे प्रशांत पवार हे नगराध्यक्ष होते. त्यांनी देखील सव्वा वर्षाचा कार्यकाळ पद सांभाळले. राजेंद्र पाटील यांच्या राजीनामा दिल्यानंतर नवीन नगराध्यक्ष पदाची निवड कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.