धक्कादायक: संरक्षण मंत्रालयातून राफेलची कागदपत्रे चोरीला

0

नवी दिल्ली :- राफेल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राफेल डीलमधील महत्त्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली. दरम्यान, कागदपत्रे चोरीप्रकरणी सरकारने काय कारवाई केली हे सांगावे, असे आदेश कोर्टाने महाधिवक्त्यांना दिले.

राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला क्लिन चिट दिली होती. मात्र या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यानिमित्ताने मोदी सरकारच्या अडचणीत वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाने राफेल डीलमध्ये हस्तक्षेप करुन समांतर वाटाघाटी केल्याचं वृत्त ‘द हिंदू’ वृत्तपत्रानं दिलं होते. काही गोपनीय कागदपत्रांच्या आधारे ‘द हिंदू’नं हे वृत्त दिले होते. ही कागदपत्रं चोरीला गेल्याची माहिती महाधिवक्ते के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. ‘द हिंदू’नं ज्या कागदपत्रांच्या आधारे राफेल डीलबद्दलचे वृत्त दिले, ती कागदपत्रं सादर केल्यास देशाच्या सुरक्षेला धक्का पोहोचेल, असा दावा वेणुगोपाल यांनी केला.

कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती दिल्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांची कानउघाडणी केली.
‘कागदपत्रं चोरीला गेल्यानंतर सरकारनं काय पावलं उचलली?,’ असा प्रश्न गोगोई यांनी महाधिवक्त्यांना विचारला. महत्त्वाची माहिती असलेल्या फाईल चोरीला गेल्यानंतर सरकारने काय केले, याचा पूर्ण तपशील द्या, अशा सूचना सरन्यायाधीशांनी महाधिवक्त्यांना दिल्या. यावेळी युक्तीवाद करताना महाधिवक्त्यांनी कागदपत्रांच्या चोरीसाठी ‘द हिंदू’ला जबाबदार धरलं. द हिंदूनं संरक्षण मंत्रालयातील महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्वत:च्या सोयीनं वापर केल्याचा आरोपदेखील सरकारच्या वतीनं महाधिवक्त्यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.