मुक्ताई गाथ्याचे १९ रोजी यज्ञेश्‍वर आश्रमात प्रकाशन

0

भुसावळ:-मुक्ताईनगर तालुक्यातील मेहूण-चिंचोल येथील श्रीयज्ञेश्‍वर आश्रमात श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई गाथ्याचे प्रकाशन रविवार, दि. १९ मे २०१९ रोजी सकाळी ८ वाजता करण्यात येणार आहे.

प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्रीयज्ञेश्‍वर आश्रमाचे अध्यक्ष शारंगधर महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.चैनसुख संचेती, अंबादास महाराज, रामराव महाराज, सुधाकर महाराज, लक्ष्मण महाराज यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सार्थ गाथ्याचे लेखक ऍड. गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी) आहेत. त्यांनी वयाची ६७ वर्षे ओलांडली असून ९० टक्के अंध आहेत. असे असले तरी आपल्या संपूर्ण आयुष्यात केलेल्या संत वाङ्मय अभ्यासाच्या बळावर त्यांनी आपल्या दांडग्या स्मरणशक्तीने मुक्ताईंच्या अभंगांचा अर्थ सांगावा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुलोचनाबाई चौधरी यांनी तो लिहून घ्यावा अशा पद्धतीने श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई गाथा हा ग्रंथ सिद्धीस आला आहे. जळगाव येथील प्रशांत पब्लिकेशन्सने हा गाथा प्रकाशित केला असून प्रकाशक लक्ष्मण महाराज चिखलीकर आहेत. गुरूदास भास्करगिरी महाराज यांनी आशीर्वाद तर तुकाराम महाराज सखारामपूर इलोरेकर यांनी पुरस्कार प्रदान केला आहे. तसेच संत साहित्याचे अभ्यासक डॉ. जगदीश पाटील सर यांनी या गाथ्यात मुक्ताई चरित्र लेखन केले आहे. त्याचप्रमाणे ङ्गैजपूर येथील कलाविष्कार गृपने रेखाटलेल्या संत मुक्ताईंच्या तैलचित्रांचाही समावेश गाथ्यात करण्यात आला आहे. मुक्ताई गाथा प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.