दुभाजकावर दुचाकी आदळली; रेल्वे कर्मचारी गंभीर जखमी

0

भुसावळ – येथील संत गाडगेबाबा हिंदी विद्यालय क्वार्टर भागातील रहिवासी तथा रेल्वेच्या सीअँडडब्ल्यू विभागात कार्यरत कर्मचारी येथील ऑर्डनन्स निर्माणीच्या प्रवेश व्दारासमोर असलेल्या दुभाजकावर मोटर सायकल आदळून अपघात झाल्याची घटना 16 मे रोजी मध्यरात्रीचे सुमारास घडली .25 वर्षीय या तरुणाची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारार्थ जळगाव येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

झेडटीसी भागात आपले काही खाजगी काम आटोपून रेल्वे कर्मचारी मुकेश गौतम आगळे (वय 25 ) हा त्याची मोटारसायकल क्रमांक एम एच 19- ए डब्ल्यु 293 या गाडीवरून घरी जात असतानाच भुसावळ आयुध निर्माणी  प्रवेश द्वारा समोरील दुभाजकावर त्यांची गाडी आदळली यामुळे ते जोराने खाली फेकले गेले. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले .दरम्यान एससी एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे सुधीर जंजाळे,भूषण घोलप आदींनी त्यांना त्वरित भुसावळ रेल्वे रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्त्रावामुळे प्रकृती खालावत चालल्याने त्यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आयुध निर्माणी प्रवेशद्वारा समोर असलेल्या दुभाजकामुळे याआधी सुद्धा अनेकदा अपघात झाले आहे. तर तीन चार जणांचे बळी गेले आहे. परंतु  आयुध निर्माणी प्रशासन प्रत्येक वेळेला तक्रार करणा-या विरुद्ध कायद्याचा धाक दाखवून सदर बाबी कडे दुर्लक्ष करीत असल्याची ओरड नागरिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.