मुक्ताईनगरला पिता पुत्राला कोरोनाची लागण ; संपर्कातील १६ जन क्वारटाईन

0

मुक्ताईनगर (प्रतिनीधी) : संत मुक्ताबाई च्या पावन भुमित गेल्या दोन महिन्यात कोरोना लाँकडाऊन दरम्यान एकही कोरोना पाँजिटीयु रुग्ण मुक्ताईनगर शहरात किंवा तालुक्यात मिळुन आला नव्हता आणि शासनाने लावुन दिलेल्या लाँकडाऊन दरम्यान नियम अटीचे शहरातील नागरिक पालन करीत होते.तसेच जिवन आवश्यक वस्तुचे दुकाने सुध्दा ठरवून दिलेल्या वेळेतच उघडी ठेवून व्यापारी नी सहकार्य केले.

म्हणून जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व बोदवड हे दोन तालुक्यात एकही रुग्ण दि. 30 मे पर्यंत आढळून आले नाही. हि संत मुक्ताबाई ची कुरपा तालुक्यात आहे असे जाणकार भाविक लोकांन मध्ये चर्चा सुरू होती. मागील काही दिवसांपूर्वी मन्यारखेड्यात एक बाहेर गावातील महिला व एक भुसावळ येथील पुरुष मुक्ताईनगर येथे मुक्काम नातेवाईकांन कडे करून गेले होते. त्यांना कोरोना ची लागण झाली होती.
परंतु त्यांच्या सहवासात आलेल्या लोकांना स्वँब घेतला असता त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता .रूग्णालयातील कर्मचारी ,पोलिस व महसूल विभागाचे कर्मचारी, नगर पंचायत कर्मचारी, डॉक्टर ,कंपावडर ,अंगनवाडी सेविका ,सफाई कामगार, सरपंच, पोलीस पाटील आदी शासकीय आदेशानुसार पालन करून जिवापाड कोरोना विषाणू चा प्रसार होवू नये म्हणून काम करीत आहे तरी देखील मुक्ताईनगर शहरात ग्रहण लागलेच.
शहरातील एका राजकीय पक्षाचे पद्अधिकारी असलेले ईसम व त्यांचे पुत्र अल्पवयीन हे दोघ पिता पुत्र याचा अहवाल पाझीटुव आला आहे व त्यांचे सहवासात आलेल्या 16/- इसमांना होम काँरटाईन करून त्यांचे स्वँब घेण्यात आले आहे त्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. दरम्यान घरा कडील जुन्या गावात जाणारा रस्ता हा लागलीच प्रशासनाने सिल केला असुन आज दिवसभर आत्याआवशक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत व लाँकडाऊन चे कडकडीत नियमांचे पालन केले जात आहे.

ऐन पावसाळ्याचे सुरवातीलाच 1जून पासुन मुक्ताईनगरला कोरोनाचा शिरकाव झाला असुन दोन झणांना लागण होवून खाते उघडले आहे. गावातील नाकरीक हे भयभित झालेले दिसून येत आहे पोलिसांनी ठिकठिकाणी नाका बंदी केली असुन चोक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आता नाकरीक यांनी खबरदारी घेवुन मास्क लावुन ,सेनीटायझर चा उपयोग करून वेळोवेळी साबणाने हात धुवून काळजी आपली व कुटुंबातील इसमांची घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.