मुक्ताईनगरच्या आमदारांनी शहरात भेदभाव करू नये?

0

मुक्ताईनगर प्रतिनिधी : मुक्ताईनगर शहरात नव्याने जी कामे मंजूर झाले आहेत ती कामे मुक्ताईनगर शहरातील ठराविक प्रभागांमध्येच मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे मा.आमदार हे केवळ काही प्रभागाचेच नसून संपूर्ण शहराचे आहेत. तर त्यांच्या नगरसेवकांनी शहरवासीयांची दिशाभूल थांबवावी अशी भावना मुक्ताईनगरच्या उपनगराध्यक्ष मनिषा पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.याप्रसंगीी नगरसेविका साधना हरिषचंद्र ससाणे, नगरसेवक मस्तान कुरेशी, नगरसेवक शकील सर, नगरसेवक निलेश सिरसाठ, नगरसेवक बिल्किसबी आसिफ बागवान, नगरसेवक कुंदाताई अनिल पाटील, नगरसेवक शमिनबी अहमद खान ई. उपस्थित होते.

याबाबत त्या पुढे म्हणाल्या की मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतमध्ये झाले. तेव्हा आमचे नेते मा.आ.एकनाथराव खडसे व मा.खा.रक्षाताई खडसे यांनी १५ ते २० कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करीत असतांना शहरातील सर्वच्या सर्व प्रभागांमध्ये समान न्याय या हक्काने विकास कामे करण्यात आलेली आहे. त्यात प्रभाग १२, १४, १७ या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये देखील विकास कामाचा समावेश होता. मात्र आता आपले मा.आमदार यांनी नव्याने मंजूर करून जी कामे आणले आहेत ती सेनेच्याच नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये मंजूर करण्यात आले आहे यात काही गौड बंगाल आहे का? त्यांच्या नगरसेवकांनी आधी जाहीर करावे अशी मागणी करून मा.आमदार हे शहरातील काही ठराविक प्रभागांचेच नसून त्यांनी संपूर्ण शहरातील विकास कामे करावीत अशी मागणी करून सेनेच्या नगरसेवकांनी जनतेची दिशाभूल थांबवावी अशी मागणी देखील केली आहे. एवढेच नव्हे तर नगरपंचायत च्या मासिक सभेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक हजर नसताना देखील त्यांच्या प्रभागातील कामे आपण मंजूर केल्याचा दावा भाजपाच्या नगरसेवकांनी याप्रसंगी केला. तसेच नगरपंचायत नव्याने अस्तित्वात आल्यानंतर माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी 20 कोटी रुपयांची विकासकामे आणली होती ती सर्वच प्रभागांसाठी होती अशा ठराविक प्रभागांना विरोध त्यामध्ये कधीही केला नाही असेही नगरसेवकांनी या प्रसंगी मत व्यक्त केले.

ज्यावेळी आमचे नेते मा.एकनाथराव खडसे व मा.खा.रक्षाताई खडसे यांनी जी कामे मंजूर करून आणली त्यात सर्व प्रभागाचा समवेश होता त्यानंतर मा.आमदारांनी दलितेतर व नगरोत्थान योजनेतून जी कामे मंजूर केली ती ठराविक प्रभागांमध्येच मंजूर केलीत, असे चार वेळा झाले त्या कामांना मासिक सभेत मंजूरी देण्यात आली. परंतु आता या दुपट्टी कामांच्या ठरावांना आमच्या नगरसेवकांचा कायम विरोध राहील व आमच्या नेत्यांचा मा.आमदारांनी आदर्श घेऊन सर्व शहराला न्याय द्यावा अशी मागणी उपनगराध्यक्षा मनिषा प्रविण पाटील व नगरसेवकांनी केली आहे.

संतोष उर्फ बबलू कोळी (भाजपा उपगट नेता)

पत्रकार परिषदेला हजर असलेले सर्वच नगरसेवक भाजपाचेच आहेत का ?याचा आत्मपरीक्षण त्यांनी करावें, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये यापैकी बहुतांशी नगरसेवक आणि नगरसेविकांचे पती उपस्थिती देतात. हे भाजपाचेच जर असतील तर त्यांनी उद्या आमच्या सोबत गिरीश महाजन यांच्याकडे यावे व पत्रकार परिषद घ्यावी. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती दर्शवणारे नगरसेवकसह व नगरसेविकांचे पती हे आज खासदार कार्यालयात पत्रकार परिषद घेतात हेच भाजप चे दुर्दैव आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 11 मे रोजी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकार्‍यांना 1 पत्र निर्गमित केले असून त्याद्वारे लेखा संहिता 2013 नुसार देयक प्रमाणक नमुना 64 वर बँकेचे व्यवहारा संदर्भात नगराध्यक्ष यांची स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नसल्याबाबतचे निर्गमित केलेले असून आजही ते निर्देश कायम असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे नगराध्यक्ष यांचे अधिकार मर्यादित झाल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 11 मे रोजी जिल्ह्यातील सर्व मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र निर्गमित केले असून त्याद्वारे लेखा संहिता 2013 नुसार देयक प्रमाणक नमुना 64 वर बँकेच्या व्यवहारा संदर्भात नगराध्यक्ष यांची स्वाक्षरी घेण्याची आवश्यकता नसल्याबाबतचे निर्गमित केले असून ते निर्देश आजही कायम असल्याचे म्हटले आहे त्यामुळे नगराध्यक्षांचे अधिकार मर्यादित झाल्याचे स्पष्ट होत आहे.

 

 

नजमा तडवी (नगराध्यक्ष)

आज झालेल्या पत्रकार परिषदेत संदर्भात मला तसेच गटनेते उपगट नेते यांच्यासह पाच मुख्य नगरसेवकांना तसेच स्वीकृत नगरसेवक यांना देखील पत्रकार परिषदेची कोणतीही कल्पना दिली नाही त्यामुळे आम्ही पत्रकार परिषदेला हजर होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.