दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज कोरोनाग्रस्तांची संख्या ३०० च्या आत

0

जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आता सुधारू लागली आहे. मागील गेल्या दीड दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यात रोज १००० ते १२०० रुग्ण आढळून येत होते. ते आता २०० ते ३०० च्या आत येऊ लागल्याने खूप मोठा दिलासादायक चित्र आहे. आज मंगळवारी जिल्ह्यात २९१ नवे रुग्ण आढळून आले आहे तर ८०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे.

आजच्या आकडेवारी नंतर जिल्ह्यात एकूण बधिताचा आकडा १ लाख ३८ हजार ९१६ वर गेला आहे त्यापैकी १ लाख २९ हजार ७२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर आज ८ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृताचा आकडा २५०३ वर गेला आहे.

जळगाव शहर-३३, जळगाव ग्रामीण-१९, भुसावळ-२१, अमळनेर-९, चोपडा-१२, पाचोरा-१८, भडगाव-०, धरणगाव-१२, यावल-०५, एरंडोल-१३, जामनेर-२१, रावेर-१९, पारोळा-१५, चाळीसगाव-५२, मुक्ताईनगर-१७, बोदवड-१६ आणि इतर जिल्ह्यात ९

Leave A Reply

Your email address will not be published.