भडगाव तालुक्यात गुरे चोरणारी टोळी सक्रिय; जीशहरातून बैलजोडी सह गाय, वासरू चोरी

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव शहरातील बि.एस.एन.एल. ऑफिस जवळील खळ्यात बांधलेल्या दोन बैल, एक गाय, एक वासरू असे चार गुरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून या बाबत भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरे चोरणारी टोळी भडगाव तालुक्यात सक्रिय असून पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे

या बाबत अधिक माहिती अशी की,
येथील धनगई गल्लीतील रहिवाशी गणेश शिंदे हे दि. 22 रोजी रात्री येथील बी.एस.एन.एल जवळील खळ्यात बांधलेल्या जनावरांना रात्री 11 वाजता चारा पाणी टाकून घरी गेले. व दि. 23 रोजी पहाटे 5 वाजता पुन्हा चारा टाकण्यास गेले असता गोठ्याचे लोखंडी गेट ची साखळी तोडून गोठ्यात बांधलेले दोन बैल (६० हजार किंमतीची ), गाय (२० हजार रुपये) वासरी (४ हजार) असा एकूण ८४ हजार किंमतीची गुरे चोरी गेल्याचे लक्षात आले.

याबाबत शेतकरी गणेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत पुढील तपास पोलिस करत आहे.भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना अलर्ट राहून काम करण्याची वेळ आली आहे. सातत्याने तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या बैलजोडी, गाय, म्हेस चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी याबाबत गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.