मुंबई आणि पटना, रक्सौल दरम्यान उत्सव विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार

0

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेने उत्सव विशेष  गाड्यांच्या सेवा वाढविण्याचा निर्णय  घेतला असून मुंबई आणि पटना/रक्सौल दरम्यान उत्सव विशेष गाड्यांच्या सेवांचा विस्तार करण्यात आला आहे .

 

 मुंबई-पाटणा उत्सव विशेष (द्वि-साप्ताहिक) 

 

03260 उत्सव विशेष दि. ४.१२.२०२० ते १.०१.२०२१ (९ फे-या) दरम्यान दर मंगळवार आणि शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.०५ वाजता सुटेल आणि पाटणा जंक्शन येथे दुसर्‍या दिवशी १३.४० वाजता पोहोचेल. 03259 उत्सव विशेष दि. २.१२.२०२० ते ३०.१२.२०२० (९ फे-या) दरम्यान दर बुधवार आणि रविवारी पाटणा जंक्शन येथून १३.०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी १५.१५ वाजता पोहोचेल.

थांबे : भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छिवकी, पं.  दीनदयाल उपाध्याय जं आणि रघुनाथपूर.

 

मुंबई- रक्सौल उत्सव विशेष (साप्ताहिक) 

 

02546 उत्सव विशेष दि.  ०५.१२.२०२० ते २.०१.२०२१ (५ फे-या) दर शनिवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.४० ​​वाजता सुटेल आणि रक्सौल जंक्शनला तिसर्‍या दिवशी ०७.४५ वाजता पोहोचेल.

02545 उत्सव विशेष दि. ३.१२.२०२० ते ३१.१२.२०२० (५ फे-या) दर गुरुवारी रक्सौल जं. येथून १६.५५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे  तिसर्‍या दिवशी ०५.३० वाजता पोहोचेल.

थांबे : कल्याण, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं.  दीनदयाल उपाध्याय जंक्शन, पाटणा, बरौनी, समस्तीपूर, दरभंगा, कामतौल, जनकपूर रोड, सीतामढी आणि बैराग्निया.

 

आरक्षण : पूर्णतःआरक्षित असलेल्या 03260 आणि 02546 या उत्सव विशेष गाड्यांचा विशेष शुल्कासह  बुकिंग दि. ०१.१२.२०२० रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल.

 

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची  परवानगी देण्यात येईल.

 

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ संबंधित सर्व नियमांचे पालन, प्रमाणित मापदंड निकष पाळण्याचा सल्ला दिला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.