मुंबईसह बरौनी, वाराणसीसह नागपूरसाठी विशेष गाड्या

0
भुसावळ- उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना वाढलेली गर्दी पाहता मुंबईसह, बरौनी, वाराणसी तसेच नागपूर दरम्यान विशेष उन्हाळी गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाड्यांमुळे रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांची गर्दी कमी होवून रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-बरौनी साप्ताहिक विशेष सुपर फास्ट गाडी
गाडी क्रमांक 01133 लोकमान्य टिळक टर्मिनस-बरौनी ही 11 एप्रिल ते 4 जुलै दरम्यान धावणार असून मएलटीटीहून ही गाडी 5.10 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सायंकाळी सहा वाजता बरौनीला पोहोचेल. गाडी क्रमांक 02062 बरोनी-एलटीटी ही गाडी 12 एप्रिल ते 5 जुलै दरम्यान धावणार आहे. रात्री 9.10 वाजता ही गाडी सुटून तिसर्‍या दिवशी 5.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, इलाहाबाद छिओकी जंक्शन, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, पाटलीपुत्र व हाजीपुर ला थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एकूण 13 वातानुकूलित तृतीय श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत.
लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी साप्ताहिक सुविधा विशेष
गाडी क्रमांक 82101 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी साप्ताहिक सुविधा विशेष एक्स्प्रेस 8 एप्रिल ते 1 जुलै दरम्यान सोमवारी रात्री 12.45 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी 5.40 वाजता वाराणसीला पोहोचेल तर गाडी क्रमांक 82102 ही दर मंगळवारी 8 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी 12.15 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी 9 एप्रिल ते 2 जुलैदरम्यान धावणार आहे. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, माणिकपूर, इलाहबाद, छियोंकी जंक्शन थांबा देण्यात आला. या गाडीला 13 वातानुकूलित तृतीय श्रेणीचे डबे जोडण्यात येणार आहेत.
छत्रपती शिवाजी महारसज टर्मिनस मुंबई-नागपुर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष
गाडी क्रमांक 02021 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 14 एप्रिल ते 30 जून दरम्यान धावणार आहे. मध्यरात्री 12.20 वाजता ही गाडी सुटल्यानंतर दुपारी अडीच वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01074 ही 14 एप्रिल ते 30 जून दरम्यान दर रविवारी चार वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी 8.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव तसेच वर्धा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 12 स्लीपर, पाच जनरल डबे जोडण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी
गाडी क्रमांक 01075 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून 15 एप्रिल ते 1 जुलै दरम्यान दर सोमवारी 11.30 वाजता सुटून दुसर्‍या विशी 2.40 वाजता नागपूरला पोहोचेल. गाडी क्रमांक 01076 ही 16 एप्रिल ते 2 जुलै दरम्यान दर मंगळवारी 6.50 वाजता सुटून त्याच दिवशी 11.25 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, धामनगांव, पुलगाव व वर्धा रेल्वे स्थानकावर थांबेल. या गाडीला 12 स्लीपर तसेच पाच सजनरल डबे जोडण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.