पाचोऱ्यातील आधारवड एक सामाजिक उपक्रमाला १ वर्ष पूर्ण

0

अखंडित ३६५ दिवस सेवा दिल्याबद्दल आदरवडचा केला सत्कार

पाचोरा : – पाचोरा शहरामध्ये मागील वर्षी १ एप्रिल २०१८ रोजी शहरातील काही युवकांनी मिळून आधारवड म्हणून एक सामाजिक उपक्रम सुरु केला होता. ह्या उपक्रमाला आज तब्ब्ल अखंडित १ वर्ष पूर्ण झाला आहे. आधारवड ही संकल्पना पाचोरा शहरातील व्यावसायिक प्रविण पाटील, भूषण देशमुख, राहूल पाटील, रवी देवरे यांनी यांच्या संकल्पनेतून पाचोरा शहरामध्ये पोलीस स्टेशन तहसील आवारात पाण्याच्या टाकी जवळ सुरुवात करण्यात आली.

या आधारवड मध्ये सुरुवातील दररोज ५० ते ६० लोकांचे जेवण बनविण्यात येत होते. आता प्रत्येक दिवशी १०० लोकांचे जेवण आधारवड येथे बनविण्यात येते. आता पर्यंत १ लाख ५० हजार पेक्षा जास्त लोकांना आता पर्यंत जेवन दिल्याची नोंद करण्यात आली आहे. यासाठी दररोज लागणारा खर्च कुठलीही वर्गणी न करता स्वतःच्या खिसातून करण्यात येत होता.

आधारवड मध्ये अश्या लोकांना जेवण दिले जाते कि त्यांना कोणीही वाली नाही त्यामध्ये भिकारी, वयोवृद्ध आजी,बाबा,काकू,वेडसर,गतिमंद त्याच बरोबर पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील ऍडमिट झालेल्या रुग्णांसाठी देखील हि सेवा देण्यात येते. हळू हळू पाचोरा शहरातील व्यावसायिक, व्यापारी,कर्मचारी, अधिकारी, युवा कार्यकर्त्यांनी आधारवड कडे लक्ष केंद्रित केले आणि आपल्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो म्हणून आपल्या वाढदिवसाला कुठेही खर्च न करता आधारवड मधील लोकांना जेऊ घालण्यासाठी जो खर्च येतो तो खर्च करू लागले असे बघता बघता पाचोरा तालुक्यातील जवळपास सर्वच परिसरातील मान्यवर, कार्यकर्ते,अधिकारी यांचे वाढदिवस आधारवड येथे साजरे केले जातात. बघता बघता आधारवड मध्ये आज एकाच वर्षात वाढदिवसाच्या तारखा आगाऊमध्ये आधारवड येथे बुकिंग करण्यात आल्या आहेत.

आधारवर या सामाजिक उपक्रमामध्ये याच बरोबर लक्ष्मण पाटील, गजु गुडेकर, सचिन सदनशिव, गणेश सोनार, गभिर सर, बबलू पाटील, महेंद्र अग्रवाल यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे. यावेळी पाचोरा पोलीस स्टेशन चे दबंग पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, युवा नेते अमोल शिंदे, पी.टी.सी. चेअरमन तथा नगरसेवक संजय वाघ, संजय एरंडे, योगेश पाटील, संजय पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.