मुंबईत ९ डिसेंबरला होणाऱ्या आदीवासी संघर्ष समीतीच्या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – नितीन कांडेलकर

0

यावल (प्रतिनीधी ) माजी मंत्री दशरथ भांडे  यांच्या उपस्थितीत ९ डीसेंबर रोजी मुंबईत आदीवासी संघर्ष समीतीच्या  माध्यमातून समाजाच्या जातीचा दाखला, वैद्य प्रमाणपत्र सह विविध समस्यांचा होणारा त्रास सहन करावा लागत असुन शासन समस्या  सोडविण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन समाज बांधवानी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन आदीवासी संघर्ष समीतीचे जिल्हाध्यक्ष नितीन कांडेलकर यांनी यावल येथे कोळी समाज बांधवाच्या बैठकीत केले.

यावल येथील खरेदी विक्री संघाच्या कार्यलयात आदीवासी संघर्ष समीतीची बैठक जिल्हाध्यक्ष नितीन कांडेलकर यांचा उपस्थित झाली.यावेळी जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, संयोजक अँड गणेश सोनवणे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे ,महिला जिल्हाध्यक्ष सुनिताताई तायडे ,संजय कांडेलकर ,समाधान मोरे, मनोहर कोळी ,प्रशांत सोनवणे आदी उपस्थित होते.

बैठकीत ९ डीसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चा बाबत माहीती देण्यात आली.  तसेच विविध तालुका कार्यकरणी व जिल्हा स्तरावर नियूक्त करण्यात आलेल्या पदाधिकारी यांना  मान्यवरांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यांची होती उपस्थिती

 

यावेळी अँड . गणेश सोनवणे, प्रभाकर आप्पा सोनवणे,  संजय कांडेलकर,  पाडळसा उपसरपंच खेमंचद कोळी ,कीरण कोळी, सामाजिक कार्यकर्ता संदिप सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी जांलधर कोळी ,भरत कोळी, आकाश कोळी,गोकुळ कोळी, अमर कोळी, गजानन कोळी, योगेश कोळी, गौरव कोळी,  अनिल कोळी, रामभाऊ सोनवणे, भगवान नन्नवरे ,अमोल सोनवणे,  तालुक्यातील विविध गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्तविक व सुत्रसंचालन खेमंचद कोळी यांनी केले तर आभार भरत कोळी यांनी मानले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.