मुंबईतल्या अरबी समुद्राचं खवळलेलं हे रुप पाहून थक्कव्हाल ; पाहा व्हिडीओ

0

मुंबई : महाराष्ट्रामध्ये तौक्ते चक्रीवादळाने मोठा हाहा:कार माजवला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्र खवळला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सध्याची परिस्थिती विषद करणारे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. वादळामुळे अरबी समुद्राचं खवळलेलं रुप पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

हा व्हिडीओ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील चक्रीवादळाची स्थिती सांगतो आहे. समुद्रातील पाणी थेट गेटवे ऑफ इंडियाच्या पायथ्यावर आदळत आहे. हा व्हिडीओ ताज हॉटेलमधून शूट करण्यात आला असून त्याला मोठ्या संख्येने पाहिले जात आहे.

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाने कालपासून धुमाकूळ घातला आहे. मुंबईत ताशी 114 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. सोमवारचं दिवसभरातील हे सर्वात मोठं आणि भयंकर असं वादळ आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची आणि झाडांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचले आहे. कोणताही अनर्थ ओढवू नये म्हणून मुंबईत एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. मुंबईत एनडीआरएफच्या तीन टीम तैनात असून राज्यभरात एकूण 12 टीम तैनात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.