मुंदखेडा येथे दुरई खाल्ल्याने 30 गुरांना विषबाधा,3 गुरे दगावले

0

जामनेर :- तालुक्यातील मुंदखेडा येथे एकाच वेळी शेतातील दुरई खाल्ल्याने सुमारे पंचवीस ते तीस गुरांना विषबाधा झाली.त्यातील दोन गायी,एक गोऱ्हा असे तीन जणावरे दगावले.तर पंचवीसच्या वर जणावरांना वाचवीण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ स्थानीक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधुन घटनास्थळी पशुवैद्यकीय आधिकाऱ्यांचे पथक,प्रमुख कार्यकर्त्यांना तात्काळ पाठविले.

याबाबत माहिती अशी की नेहमी प्रमाणे गुराख्यांनी आप-आपली गुरे चारण्यासाठी नेली असता, शेतातील ज्वारीची दुरई गुरांच्या खाण्यात आली.त्यानंतर सर्व गुरे पाणी प्याली,त्यानंतर निंबाच्या झाडाखाली विसावा घेण्यासाठी स्थिरावले,मात्र काही गुरांना चक्कर यायला लागल्याचे गुराख्यांना दिसले.त्यांनी लागलीच मंत्री महाजनांशी दुरध्वनी साधला व घटनेची माहिती दिली.लागलीच  जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, स्विय सहायक संतोष बारी, कार्यालयीन प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे,आनंदा लाव्हरे,विशाल माळी,एकनाथ पाटील,मखराम पवार,सुपडु महाजन यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमधे डॉ. डि.एच.पाटील,डॉ श्रीकांत व्यवहारे,डॉ राजेंद्रकुमार अंकीतवार,आरीफ देशमुख आदींनी घटनास्थळी जाऊन विषबाधेची लागण झालेल्या सर्व जणावरांवर वेळ न दवडता औषधोपचारास सुरूवात केली, आणी सलाईन लावल्या,त्यामुळे बहुतांश गुरांना जिवनदान देण्यात पथकाला यश आले.सुभाष काशीराम पाटील यांची गाय- गोऱ्हा,प्रल्हाद शंकर पवार यांची एक गाय अशी एकुुण तीन गुरे दगावली.

Leave A Reply

Your email address will not be published.