ओझरखेड्या नजीक रिक्षा पलटी होवून दोन गंभीर जखमी

0

भुसावळ :- प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी रिक्षेत बसवल्याने ओव्हर लोडिंगमुळे रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात रिक्षात बसलेल्या सात आठ प्रवासी जखमी झाल्याची घटना तालुक्यातील ओझरखेडा येथे मंगळवार घडली. अपघातातील जखमीमध्ये दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना वरणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

वरणगांव येथील मंगळवारचा बाजार आटोपून ओझरखेडा येथे जाणाऱ्या रिक्षा (क्रं.एम.एच.१९ / व्ही.६६६२) हि रिक्षा ओझरखेडा व तळवेल गावाच्या मध्ये पलटी झाली. यामध्ये सहा ते सात जण जखमी झाले. यामध्ये त्र्यंबक नेमाडे (वय ६०) तर मनोज बाणाईत अंदाजे (वय ३०)  हे गंभीर जखमी  झाले. सर्व जखमींवर वरणगांव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हि रिक्षा विलास बोदडे चालवत असल्याचे समजते . रिक्षामध्ये केवळ तिन ते चार प्रवासी वाहतुकीचा परवाना असतांना सात ते आठ प्रवाशी कसे ? यावरुन वरणगांव परिसरात अवैध प्रवासी वाहतुक होत असल्याचे समोर आले आहे .मात्र पोलीस हे प्रकरण दडपण्याच्या तयारीत असुन रिक्षाचे पुढील टायर फुटल्याचे सांगीतले जात आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.