मी माफी मागणार नाही ; राहूल गांधी

0

नवी दिल्ली :  काँग्रेस नेते राहुल गांधींच्या रेप इन इंडिया वक्तव्यावरुन आज लोकसभेत भाजप खासदारांनी मोठा गदारोळ केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही राहुल गांधी यांचे हे वक्तव्य निंदनीय आहे त्यांनी माफी मागावी अशी मागणी करत सभागृहात गदारोळ घातला. परंतू  राहुल गांधी यांनी आपण माफी मागणार नसल्याचं सांगितलं आहे.

यावर बोलताना राहुल गांधी यांनी आपण कधीही त्यांची माफी मागणार नाही असं स्पष्ट केलं आहे. महत्वाच्या मुद्द्यावरुन लक्ष हटवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
नरेंद्र मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली होती. मात्र भारतात कुठेही बघितलं तर बलात्कार होत आहेत. यामुळे मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया झाला आहे. जर तुम्ही वृत्तपत्रे पाहिलीत तर तुम्हाला कळेल की उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या आमदारानं एका मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर तिचा अपघात घडवून आणला. तरीही मोदी शांत आहेत. मोदी म्हणाले कि, बेटी बचाओ, बेटी पढाओ पण कोणापासून वाचवायचे हे सांगितले नाही. तर नरेंद्र मोदींच्या आमदारापासून मुलींना वाचवायचे आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.