तामसवाडी जिल्हा बँक शाखेत तेवीस लाखाचा अपहार !

0

तत्कालिन शाखा व्यवस्थापकावर गुन्हा 

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील तामसवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत तेवीस लाखाचा अपहार केल्या प्रकरणी तत्कालिन तामसवाडी शाखा व्यवस्थापकावर दि. 11 रोजी अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत लेखा परिक्षक अंकीत कैलास अग्रवाल रा औरंगाबाद यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले कि,दि 28 आँगस्ट 2019 ते 30 आँगस्ट दरम्यान जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तामसवाडी शाखेचे परिक्षण केले असता या शाखेत योगेश प्रकाश पाटील रा,पारोळा याने जानेवारी 2014 ते सप्टेंबर 2018 पावेतो शाखा व्यवस्थापक पदावर कामकाज करित होते.

परिक्षणा दरम्यान माझे असे निर्देशनास आले की,तामसवाडी शाखा व्यवस्थापक योगेश पाटील यांनी कापुस अनुदान,संजय गांधी निराधार,बोंडअळी,रिबीट रकमा,अदर लायबेलिटीज या खाती तसेच शाखेतील काही खातेदारांच्या खात्यात बोगस रकमा नावे टाकुन त्या रकमा सेन्टल बँकेच्या स्वत:च्या बचत खात्यात एन,ई एफ टी ने वर्ग केलेले आहेत.तसेच स्वत:चे पारोळा शाखेतील बचत खाते मोडीफाय करुन शालिक पुंजु चौधरी या नावाने बोगस खाते तयार करुन त्या खात्यामध्ये काही रकमा वर्ग केलेल्या आहेत.

नंतर सदरच्या रकमा काढुन अपहार केल्याचे निर्देशनास आलेले आहे.इतर खाती जमा असलेल्या रकमा स्वत:च्या आर्थिक फायदयासाठी शाखा व्यवस्थापक या पदाचा दुरुपयोग करुन बेकायदेशीर रित्या शासनाकडुन प्राप्त झालेल्या रकमा त्यांनी संबंधित खातेदारांना न देता स्वत:रोखीने व स्वत:चे खात्यात, नातेवाईक व परिचित लोकांच्या खात्यात वर्ग केलेल्या आहेत.व तसा अपहार करण्याचे दुष्टीने चुकिचा हिशोब तयार करुन शाखेच्या व्यवहारात नोंदी घेतल्या आहेत.त्यावरुन तत्कालिन शाखा व्यवस्थापक योगेश प्रकाश पाटील यांनी सन 2016 ते सप्टेंबर 2018 दरम्यान काळात 22 लाख 73 हजार 734  रुपयांचा अपहार केला म्हणुन पारोळा पोलिसात तत्कालिन शाखा व्यवस्थापक विरुद्ध भाग पाच गु.रं.226 /19 प्रमाणे भादवि 406,409,465,467,468,471प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सपोनि सुदर्शन दातीर हे करित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.