मिल्लत विद्यालयात सांस्कृतीक कार्यक्रम

0

जळगाव ः   मेहरूणमधील मिल्लत हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनी प्रतिभा शिंदे यांनी ध्वजारोहन केले. यावेळी प्रायमरीतील चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलत.  शिक्षकांतर्फे या विद्यार्थांना रोख ५ हजार रुपये

बक्षीस म्हणून देण्यात आले. विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लाठींचे प्रात्यक्षिके सादर केलीत. मुख्याध्यापक शेख मुश्ताक अहमद यांनी स्वागत केले.

सोसायटीचे उपाध्यक्ष मुहम्मद रफिक शाह, विश्वस्त शेख निसार अहमद, सय्यद आबिद अली, हाजी मोइनुद्दिन शेख, इस्माईल पटेल, इक्बाल मन्सुरी, साजिद देशमुख, साबीर मुल्ला आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जमील कुरेशी यांनी केले. पर्यवेक्षक ताजोद्दिन शेख यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.