मिरगव्हाण शिवारातील अकृषक जमिनीचा परवाना अखेर रद्द

0

भुसावळ – जामनेर रोडवरील मिरगव्हाण शिवारातील गट क्र.९४/१अ/२ चा अकृषिक परवाना रद्द तसेच गट नंबर ९४/१अ/१, ९४/१ब आणि ९४/२ जमिनीवरील बांधकाम अगर हस्तांतरणास मनाई करण्याचे आदेश प्रांत  यांनी दिले आहे. मिरगव्हाण,ता.भुसावळ शिवारात असलेल्‍या जामनेर रस्‍त्‍यावरील साईबाबा मंदिर परीसरातील गट क्र.९४/१अ/२ या गटास दिलेला अकृषिक परवाना रद्द करण्यात आला असून त्यानुसार त्या गटावरील सर्व नोंदी रद्द करुन जमीन मालक ज.मु.दिनेश मोहनलाल राठी आणि इतरांचे नाव इतर हक्कातून कमी करून सातबारा उताऱ्याचे कब्जेदार सदरी दाखल करण्याचे आदेश आरटीएस/ पूर्ननिरीक्षण/क्र. ८२५/२०१८च्या अपील निर्णयावर उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी दिले. तसेच गट नंबर ९४/१अ/१, ९४/१ब आणि ९४/२ एकूण क्षेत्रफळ ५ हेक्टर ६४आर या जमिनीचा शेतव्यतिरिक्त उपयोग करताना पूर्व परवानगी न घेता कुळ कायदा कलम ४३ व त्याखालील नियमांचा कुळ कमलाबाई शंकरलाल बेहरा व इतर यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे सदर जमिनीवर उच्च न्यायालय मुंबई,खंडपीठ औरंगाबाद यांच्या न्यायालयात दाखल केलेल्या रीट पीटीशन यात अंतीम निकाल लागेपर्यंत या चारही गटातील जमिनीच्या एकूण क्षेत्रफळ ५हेक्टर ६४आर या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे बांधकाम अगर हस्तांतरण मालमत्ता धारण करु नये, असे आदेश अपील क्रमांक २६/ २०१८ च्या अपील निर्णयावर तत्‍कालीन उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी  दिले आहे. या निर्णयामुळे आता कुळ कायद्याच्या जमिनीवर परवानगी न घेता अकृषक जमिनींचा मुद्दा पून्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील इतर काही जमिनींची प्रकरणे देखील या निमित्ताने समोर येण्याची शक्यता आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.