मातृत्वप्राप्तीचा आनंद मिळविताना गर्भसंस्काराचे योगदान अनमोल : डॉ राजेश हुंडेकर

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) :-आई फाऊंडेशन ,मनशक्ति केंद्र लोणावळा व माहेश्वरी महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिन विशेष मोफत गर्भसंस्कार शिबीरात मुंबई येथील राजेशजी हुंडेकर यांनी मातृत्वप्राप्ती हा सोहळा असून तो संपूर्ण कुटूंबाने साजरा करायचा असतो असे सांगितले.

साधी एक साडी खरेदी करताना अनेक दुकानातील शेकडो साड्या चोखंदळपणे पाहणारी मायमाऊली आयुष्यभर ओळख देणाऱ्या गर्भाला वाढविताना तेवढी चौकस का नसते? हा एक अवघड प्रश्न असल्याचे ते म्हणाले.आणि म्हणूनच आजच्या गर्भसंस्कार शिबीराचे आयोजन हे त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न असल्याचेही श्री.हंडेकर म्हणाले.

महिलादिनाचा कार्यक्रम फक्त एका दिवसापर्यंतच मर्यादित न राहता तो वर्षानुवर्षे पुढच्या पिढीला सुसंस्कारीत करणारा असावा या उद्देशाने घेण्यात आल्याचे आई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनोद कोतकर यावेळी म्हणाले.  आई फाऊंडेशनच्या विविध कार्यक्रमाची माहीती सचिव डॉ.सौ चेतना कोतकर यांनी देवून उपस्थितांचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.