बोडवड महाविद्यालयात मुद्रा योजना मेळावा उत्साहात !

0

बोदवड (प्रतिनिधी) :- ग्रामीण परिसरात स्वयंरोजगार निर्माण व्हावेत,परिसरातील उत्पादन आधारित लघुउद्योग शिरू व्हावेत यासाठी शासनाद्वारे सहज व त्वरित आर्थिक सहकार्य उपलब्ध झाले असून त्यासाठी प्रधानमंत्री मुद्रायोजना उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी यानी मुद्रा योजना कार्यक्रमात केले.

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव मुद्रा योजना विभाग आयोजित प्रधान मंत्री मुद्रा योजनेचा मेळावा दि ६ मार्च २०२० रोजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्षा श्रीमती मुमताजबी बागवान, प्राचार्य अरविद चौधरी,पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड,गटविकास अधिकारी रमेश वाघ याचे हस्ते करण्यात आले.

मेळाव्यात विविध स्वयंसेवी संस्था,बँक,लघुउद्योग यांनी अधिकारीसह मार्गदर्शन केंद्र उभारून सहभाग दिला व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. चौधरी,कोषागार अधिकारी, तहसील कार्यालयातील अधिकारी,प्राध्यापक, तालुयक्यातील,महिला,युवक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.