माजी मंत्री गिरीष महाजनांच्या वाढदिवसाच्या औचित्याने चाळीसगाव येथे मोफत व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिकेचे लोकार्पण

0

चाळीसगाव – राज्यात आपल्या आरोग्यसेवेसाठी प्रसिद्ध असणारे माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री आमदार गिरीषभाऊ महाजन यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील रुग्णांसाठी मोफत व्हेंटिलेटरयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण महात्मा फुले आरोग्य संकुल येथील कोविड केअर सेंटर येथे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजुमामा भोळे यांच्याहस्ते करण्यात आले. सदर अत्याधुनिक रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी हलविणे सोयीचे होणार आहे तसेच ही रुग्णवाहिका मोफत उपलब्ध होत असल्याने बाहेर येणारा हजारोंचा खर्च देखील वाचणार असल्याने गरजू रुग्णांना याचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

सदर रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी नगराध्यक्षा आशालताताई विश्वास चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, जिल्हा चिटणीस प्रशांत पालवे, जेष्ठ नेते उध्दवराव माळी, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम सर, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष संगीताताई गवळी, पंचायत समिती गटनेते संजू तात्या पाटील, नगरसेवक नितीन पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आनंद खरात, नगरसेवक चिराग शेख, भास्कर पाटील, बापू अहिरे, चंद्रकांत तायडे, पंचायत समिती माजी सभापती दिनेश भाऊ बोरसे, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव, अनिल गायकवाड, पंचायत समिती सदस्य सुभाष पैलवान, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंदार करंबेळकर, संघटन सरचिटणीस धनंजय मांडोळे, अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितू वाघ, योगेश खंडेलवाल, माजी पंचायत समिती सदस्य जगनआप्पा महाजन, तालुका उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, राकेश बोरसे, शिक्षक आघाडी विजय कदम सर, सदानंदभाऊ चौधरी, माजी नगरसेवक निलेश महाराज, किशोर रणधीर, सौरभ पाटील, कैलास नाना पाटील, जगदीश सूर्यवंशी, तुषार बोत्रे, प्रवीण मराठे, भाविक पटेल, मनोज गोसावी, जगदीश चव्हाण आदी उपस्थित होते.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना आमदार राजुमामा भोळे यांनी सांगितले की, सेवा ही संघटन हा विचार घेऊन कोरोना काळात भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत आहे. भाजपचा कार्यकर्ता कधीच पडत नाही कारण तो जमिनीवर राहून काम करतो, त्यामुळे सत्ता असो वा नसो काही फरक पडत नाही. राज्याचे नेते गिरीषभाऊ यांचे आरोग्य क्षेत्रातील काम सर्वाना परिचित आहे म्हणून अश्या या लोकनेत्याचा वाढदिवस कोरोना रुग्णांची, जनतेची सेवा करून जिल्हाभर साजरा केला जाणार आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी अत्याधुनिक अशी कार्डियाक रुग्णवाहिका गिरीषभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव तालुक्याला भेट दिल्याने गरजू रूग्णांना त्याचा फायदा होणार असल्याने भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी त्यांचे स्वागत करीत असल्याचे प्रतिपादन आमदार राजुमामा भोळे यांनी केले.

राज्यातील लाखो रुग्णांचे आशिर्वाद आरोग्यदूत गिरीषभाऊ यांच्या पाठीमागे, राज्याच्या सेवेसाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो याच शुभेच्छा – आमदार मंगेश चव्हाण

आपले सर्वांचे नेते गिरीषभाऊ महाजन यांचे आरोग्य क्षेत्रातले काम खूप मोठे आहे, राज्यात लाखो रुग्णांना त्यांनी आजपर्यंत सेवा दिली. त्यांच्या मणभर कामाची बरोबरी कुणीच करू शकत नाही मात्र कणभर का होईना त्यांच्या वाटेवर चालून जेव्हडी शक्य होईल तेव्हडी रुग्णसेवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी करीत आहे, गिरीषभाऊ कधीच वाढदिवस साजरा करीत नाहीत, प्रसिद्धी पासून ते नेहमीच दूर राहतात. यावर्षी देखील त्यांनी स्वतः फोन करून माझ्या वाढदिवसाला जाहिराती, बॅनर न लावता लोकांची सेवा करून वाढदिवस साजरा करण्याचा सल्ला दिला,

गिरीषभाऊंसारखे नेतृत्व राज्यातील मागील सरकार मध्ये असल्याने चाळीसगाव तालुक्यासाठी विकासकामे, ग्रामीण रुग्णालय इमारत मंजूर झाली. मागील वर्षी निधी नसल्याने बंद असलेले ग्रामीण रुग्णालयाचे काम संबंधित ठेकेदाराला विश्वासात घेऊन दीड ते दोन महिन्यात निधी नसतांना देखील पूर्ण करून घेतले. कठीण परिस्थितीत सर्वांना सोबत घेत आमदार निधीतून, प्रसंगी पदरमोड करून व चाळीसगाव मधील अनेक दात्यांच्या सहकार्याने ऑक्सिजन व इतर सुविधा उभारून हे १०० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू केले, आज आपण बघतो की खाजगी रुग्णालयात एका कोविड रुगणाला सरासरी ५ हजार रुपये एका दिवसाचा खर्च येतो, गेल्या वर्षभरात या मोफत कोविड सेंटरमुळे रुग्णांचे कोट्यवधी रुपये माझ्या सर्वसामान्य गरजू रुग्णांचे वाचले,

यावर्षी अजून ५० लाखांचा निधी देऊन कोविड नंतर देखील रुग्णांसाठी उपयुक्त ठरतील अश्या सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत,

मागील वर्षी माझ्या स्थानिक विकास निधीतून प्रस्तावित केलेल्या या अत्याधुनिक व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जास्तीतजास्त जीव वाचवणे हाच प्रयत्न राहणार असून बाहेर अश्या रुग्णवाहिकेसाठी येणारा १० ते २५ हजारापर्यंतचा एका रुग्णाचा खर्च वाचणार आहे. या सेवेच्या माध्यमातून मिळणारे गोर गरीब जनतेचे आशिर्वाद याच आरोग्यदूत गिरीषभाऊंना चाळीसगाव वासीयांच्या वतीने शुभेच्छा आहेत. राज्याच्या सेवेसाठी लाखो रुग्णांचे आशिर्वाद गिरीष भाऊंच्या सोबत असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.

सोशल डिस्टनसिंग चे पालन करून छोटेखानी स्वरुपात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर यांनी केले तसेच के बी दादा साळुंखे यांनी मनोगताच्या माध्यमातून उपस्थित पदाधिकारी – कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. सूत्रसंचालन शहर सरचिटणीस अमोल नानकर यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.