बालरोग तज्ञांनी सेवेसाठी पुढाकार घ्यावा – माजी आमदार साहेबराव पाटील

0

अमळनेर (प्रतिनिधी):- कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांवर अधिक प्रभाव टाकु शकते त्यादृष्टीने घरातील लहान मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे.

ज्याप्रमाणे पहिल्या व दुसऱ्या लाटेत लक्षणे असलेली व सौम्य लक्षणे असलेले यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले होते. त्याचरितीने तिसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा,बालकांसाठी कोविड सेंटर उभारण्यात यावे तसेच सर्व बालरोग तज्ञांनी सेवा द्यावी.आहेत ते कोविड सेंटर रुग्ण नसल्याने बंद न करता त्यांची देखभाल करून अद्ययावत ठेवावीत जेणे करून परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही.

प्रांत कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी  वरील सूचना केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.