माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची चाळीसगावी भेट

0

चाळीसगाव – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी  चाळीसगावात धावती भेट दिली. सकाळी १० वाजता माजी आमदार राजीव देशमुख यांच्या राजगड निवासस्थानी त्यांचे आगमन झाले. तर शहरातील विवीध ठिकाणी त्यांनी भेटी देवून तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधून मालेगावकडे प्रस्थान केले. अचानक झालेल्या अजितदादा पवार यांच्या दौऱ्याने चाळीसगाव तालुक्यात चर्चेला उधाण आलेले होते

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज सकाळी हिरापूर रोड येथील सुयश लॉन्स येथील लग्नास उपस्थिती दिली.राहुरीचे माजी आमदार तथा शिर्डी साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांचा पुतण्या अनिकेत आणि तालुक्यातील रांजणगाव येथील रमेश चव्हाण यांची कन्या कल्याणी यांच्या विवाहप्रसंगी अजितदादा पवार यांनी पुर्णवेळ उपस्थिती दिली.यावेळी व्यापारी देखरेख संघाचे अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख,माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह आप्तेष्ट मित्र परिवार उपस्थित होते.

उद्योजक किरण फकीरराव देशमुख यांच्या घरी कौटुंबिक भेट देत परिवारातील सदस्यांशी संवाद साधला.यावेळी अजितदादा पवार यांनी स्व.फकीरराव देशमुख यांच्याशी पवार परिवाराचा असलेल्या दृढ संबंधाना उजाळा दिला तर तालुक्यातील उद्योग धंद्याविषयी सखोल चर्चा केली.यावेळी त्यांनी खान्देशी फळांचा आस्वाद घेतला.श्रीमती सुशीला देशमुख,किरण देशमुख,छाया कदम,स्वाती देशमुख,तेजस्विनी सुर्यवंशी आदी कुटूंबातील सदस्यांसोबत त्यांनी संवाद साधला.

यानंतर अजितदादा पवार यांनी चाळीसगाव तालुक्याचे माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे यांचे दिवंगत बंधू पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यभान घोडेस्वार यांचे नुकतेच दु:खद निधन झाले.यामुळे घोडे परिवाराची सांत्वन भेट करण्यासाठी शाहू नगर येथील त्यांच्या घरी द्वारदर्शनपर भेट दिली.याप्रसंगी जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राठोड,माजी नगरसेवक संजय घोडेस्वार,युवा नेते अमोल घोडेस्वार,दडपिंप्रीचे माजी सरपंच तकतसिंग पवार,गव्हर्नमेंट कॉंन्ट्रॅक्टर प्रशांत देशमुख,नगरसेवक रामचंद्र जाधव,जिल्हा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील,भगवान पाटील,दिपक पाटील,शाम देशमुख,सूर्यकांत ठाकूर,जगदीश चौधरी,योगेश खंडेलवाल,स्वप्निल कोतकर,प्रताप भोसले,शुभम पवार,अजित सोमवंशी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.