उन्हाळी सुट्यांसाठी विशेष साप्तहिक गाड्या

0

मुंबई, गोरखपुर, वाराणसी, पुणे, काझीपेठ दरम्यान धावणार एक्सप्रेस

भुसावळ – मध्य रेल्वेने उन्हाळी सुटीत प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी विशेष साप्ताहिक गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष साप्ताहिक गाड्यांमध्ये मुंबई -वाराणसी विशेष एक्सप्रेस- गाडी क्र. ०२०५५ साप्ताहिक विशेष मुंबई  येथून दि. २१ रोजी  पहाटे ५ वाजता रवाना होऊन  दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजता वाराणसी पोहचेल. परती दरम्यान गाडी क्र. ०२०५६ साप्ताहिक विशेष वाराणसी दि. १५ ते  २२ मे दरम्यान सकाळी १० वाजता रवाना होऊन दुसर्‍या दिवशी दुपारी १.२०  वाजता मुंबई पोहचेल. दरम्यान ही गाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, माणिकपुर अलाहाबाद, छोकी  या स्थानकांवर थांबेल.

मुंबई – गोरखपुर विशेष- गाडी क्र. ०२०४७ साप्ताहिक विशेष मुंबई येथून दि.२० मे रोजी दुपारी ४.४० वाजता रवाना होवून दुसर्‍या दिवशी  रात्री ११.४५ वाजता गोरखपुर पोहचेल.परती दरम्यान गाडी क्र. ०२०४८ साप्ताहिक विशेष गोरखपुर  येथून दि.२२ रोजी सकाळी ८.५० वाजता रवाना होवून  दुसर्‍या दिवशी दुपारी २.५५  वाजता  मुंबई पोहचेल. ही गाडी दादर, कल्याण, इगतपुरी, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाल, बिना, झॉंसी, कानपूर, लखनऊ, बाराबंकी, गोंडा या स्थानकांवर थांबेल.

पुणे – काझीपेठ विशेष- गाडी क्र. ०२१५१ साप्ताहिक विशेष पुणे येथीन दि. २०,२७ मे ते  ३, १० व १७ जून रोजी रात्री ९:३० वाजता रवाना होवून दुसर्‍या दिवशी  सायं. ६:३५ वाजता काझीपेठ पोहचेल. परती दरम्यान गाडी क्र. ०२१५२ साप्ताहिक विशेष काझीपेठ येथून दि. २१, २८ मे व दि. ४ ,११ व १८ जून रोजी सायं.७ वाजता रवाना होवून दुसर्‍या दिवशी सायं ५:४० वाजता पहोचेल. ही गाडी पुणे, दौंड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगांव, अकोला, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा, वरोरा, चंद्रपुर, बल्लारशाह, शिरपुर काघजनगर, रामागुंदम, पेधापल्ली, काझीपेठ या स्थानकांवर थांबेल.

Leave A Reply

Your email address will not be published.