माजी आ. संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रोगप्रतिकारक गोळया वाटप

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  :जगात कोरोनावर आजपर्यंत कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे कोरोना सारख्या आजारावर मात करायची असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय ‘ आसे॑निक अल्बम ३० ‘ या गोळ्यांची शिफारस केली आहे. म्हणून भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागात सर्व नागरिकांना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी यांचेतर्फे संचालकांच्या हस्ते मोफत आर्सेनिक एल्बम 30 या औषधीचे वाटप करण्यात आले आहे.

सध्या देशामध्ये व महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर होमियोपॅथीक मेडिसिन ‘आर्सेनिक अल्बम ३०’ रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठीचे औषध (इम्यूनीटी बूस्टर) म्हणून सुचविले आहे. प्रभागातील नागरिकांची खबरदारी म्हणून माजी  आमदार संतोष चौधरी यांच्यामार्गदर्शना खाली

 रोगप्रतिकारक गोळया वाटप 

भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागात कृउबा समितीचे संचालकांच्या हस्ते सर्व नागरिकांना घरोघरी जाऊन मोफत गोळ्या वाटप करण्यात  येणार आहे. तसेच याचे प्रमाण कसे असणार ते सुद्धा गोळ्या वाटप करताना पत्रकाद्वारे सांगण्यात आले  असल्याचेही कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन संतोष चौधरी यांनी सांगितले. या गोळ्या खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकाबरोबर जेष्ठ नागरिक आणि कमी रोग प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना याचा फायदा निश्चित  होणार आहे  त्यांचे शरीर निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.