सलुन व्यवसायिकास दरमाह १० हजार रुपयाची मदत तातडीने द्या

0

भडगाव (प्रतिनिधी) :  राज्यातील नाभिक समाज व्यवसायिक बांधवाना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी कींवा दरमाह १० हजार रुपये मदत प्रत्येकी सलुन व्यवसायिकास तातडीने द्यावे अशी मागणी करणारे निवेदन भडगाव तहशिलदार यांच्या माध्यमातुन राज्य शासनास येथिल नाभिक समाज विकास मंडळाचे वतीने देण्यात आले.

कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव वाढु नये यासाठी शासनाने व्यवसाय बंद सह सर्व जनतेला घरातच थांबण्याचे आदेश दिले होते. यामुळे सलुन, पार्लर व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाज बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी व आपल्या मागण्या शासना पर्यत पोहचविण्यासाठी येथिल श्री. संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाचे वतीने २० एप्रिल २०२० रोजी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे. व्यवसाय बंद होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. व्यवसायिक बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनास निवेदन देवुन देखिल दखल घेतली गेली नाही. अथवा आर्थिक मदत देखिल दिली नाही. राज्यात इतर व्यवसाय सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. परंतु अद्यापही सलुन व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली नाही. दिल्ली, तामिळनाडु या राज्यात संबंधित शासनाने सलुन व्यवसाय करण्यास नियमासह परवानगी दिली आहे. अश्याच प्रकारे नियमावली घालुन राज्यात नाभिक व्यसायिकाना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. कींवा नाभिक व्यवसायिक बांधवास दरमाह २० हजार रुपये तातडीने द्यावे. अन्यथा दिनांक ८ जुन २०२० पासुन लोकशाहीच्या मुल्यांचा अधिकार नुसार आम्ही आंदोलनाची भुमिका घेवु या आंदोलना मुळे काही परीणास उदभवल्यास त्यास शासन जबाबदार राहील असे निवेदन देण्यात आले यावेळी नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष भरत चव्हाण, सचिव हिलाल नेरपगारे, खजिनदार विजय ठाकरे सह जिल्हाध्यक्ष तथा विभागिय अध्यक्ष नानासाहेब शिरसाठ हे उपस्थित होते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.