माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांची कोरोनावर मात

0

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.अशातच मागील १०-१५ दिवसांपूर्वी माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.आधी काही दिवस खाजगी हॉस्पिटल व नंतर घरीच विलगिकरणात त्यांनी उपचार घेतले.योग्य उपचार व कोरोनाच्या नियमांचे पालन यामुळेच ते कोरोनावर मात करू शकले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक काढा,कोमट पाणी व शासनाचे नियम या त्रिसूत्रीचा वापर केल्यानेच ते कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालेत.  नागरिकांनी घाबरून न जाता आपली व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.कोरोना आजार योग्य व वेळीच उपचाराने बरा होतो.लग्न समारंभ व अंत्यसंस्कार या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.यामुळे आरोग्य व्यवस्थेवर व प्रशासनावर ताण वाढत चालला आहे.गर्दी टाळण्याचे आवाहन मा.आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.