मागासवर्गीयांना पदोन्नतीबाबत कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र चाळीसगांव शाखेकङुन निवेदन

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगांव कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य ता.चाळीसगांव च्या वतीने आज दि.१७/५/२०२१(सोमवार) रोजी मा.अमोल मोरे तहसिलदार,चाळीसगांव यांना निवेदन देण्यात आले.माहे फेब्रुवारी २०२१ ते ७ मे २०२१ अखेर मागासवर्गीय पदोन्नती बाबत वेगवेगळे शासन निर्णय झालेत शासनाकडे महासंघाची वारंवार अशी मागणी आहे की,मा.उच्च न्यायालय मुंबई यांनी मागासवर्गीयांना पदोन्नती बाबत दिलेल्या निकाला वर मा.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अद्याप प्रलंबित आहे.त्यांचा जो निकाल होईल यास अधीन राहून ३३ टक्के पदोन्नतीने जागा भरा अन्यथा ३३ टक्के जागेसाठी मा.सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत रिक्त ठेवा अशी मागणी संदर्भ क्रमांक ५ अन्वये महासंघानी केली आहे.

तरी दिनांक ७/५/२०२१ चा शासन निर्णय रद्द न झाल्यास नाईलाजस्तव  चाळीसगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय अधिकारी/ कर्मचारी न्याय पद्धतीने आंदोलन करतील.याची गंभीर दखल शासनाने घ्यावी लवकरात लवकर पदोन्नती संदर्भात सुधारित आदेश निर्गमित करावे यासंबंधीची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी प्रभाकर पारवे सर(विभागिय कार्याध्यक्ष नाशिक,अति. सरचिटणीस कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य), अजित सिंग पवार साहेब( सहाय्यक गटविकास अधिकारी, चाळीसगांव),पेंढारकर साहेब(नायब तहसिलदार चाळीसगांव),विलास भोई( गटशिक्षणाधिकारी, चाळीसगांव),एम.एस.भालेराव(कृषी अधिकारी चाळीसगांव), के.व्ही.मालाजंगम(कनिष्ठ प्रशासन अधिकारी चाळीसगांव)जाधव मॅङम(अव्वल कारकुन तहसिलदार चाळीसगांव)शिवाजी जाधव,प्रदीप वाघ, देवेंद्र दाभाडे,चंद्रमणी पगारे,गजानन मोरे, तुकाराम पाटील,वाल्मिक जाधव हे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.