इंधन दरवाढीमुळे कृषी क्षेत्राला मोठा फटका

0

जळगाव:- पेट्रोल शंभरी गाठली आहे त्यापाठोपाठ आता डिझेल सुद्धा नव्वदी पार केले आहे त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळला असून कृषी क्षेत्राला याचा मोठा फटका बसत आहे ेती कामांचं खत बी बियाणे आदी कामासाठी ट्रॅक्‍टरचा वापर होतो मात्र इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टर चालकाने ही दर वाढले असून लहान-मोठे सर्व शेतकरी कुशीत आले आहेत.

शेती कामांसाठी आता ट्रॅक्टर्स विविध उपकरणांचा इंधनांची गरज भासते डिझेल वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा मशागतीचा खर्च वाढला आहे ट्रॅक्टर मुळे तीन दिवसांची कामे आता एक दिवसात होत असली तरी इंधन दरवाढीमुळे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे चित्र आहे. मे महिन्यात लगेच असतो पावसाळा तोंडावर असल्याने सध्या खरीप हंगाम पूर्वी कामांना गती मिळत आहे. नांगरणी व इतर कामे सुरू आहेत बैलजोडीचे नांगरणे आत्ता तुरळक प्रमाणात असून प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेती यांत्रिकीकरनावर जोर धरला आहे.

अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या घरी ट्रॅक्टर आला आहे शेतात एक पीक काढणे की अवघ्या एका दिवसात शेतीची मशागत करून दुसऱ्या पिकाची तयारी सुरू होते. त्यासाठी विविध अवजारे व साहित्य साधनांचा वापर होतो 50% यंत्र साहित्याला डिझेल वापरले जाते यंत्रामुळे शेतकऱ्यांची वेळेची बचतही परिश्रम वाचते तरी शेतीसाठी लागणारा खर्च वाढला आहे इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टरने भाडे तत्त्वावर काम करण्याची नांगरणी वखरणी यासह विविध कामांचे दर वाढले आहेत. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती मशागत अवघड झाली आहे. शेतीसाठी त्याचा उत्पादन खर्च शेतमालाला मिळणारा बाजारभाव व सर्व खर्च पाहता शेतमालाला हमी भाव  मिळणे आवश्यक झाले आहे. उत्पादन शेतमाल वाहतूक खर्च वाढल्याने शेती मुश्कील झाले आहे यंत्रयुगात बैलजोडीस जवळपास हद्दपार झाली आहे अशा  परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी शासनाने इंधन व ट्रॅक्टरसाठीच्या डिझेल करिता दरात सवलत व अनुदान आता गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.