महिलेची रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या

0

जळगाव :- शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळ एका महिलेने रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. रेखा राठोड(४८) असे मयत महिलेचे नाव असून यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

रेखा राठोड या शहरातील पतंग गल्ली जोशी पेठ मध्ये राहतात. येथून त्यांनी आज पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास पिंप्राळा रेल्वे गेटजवळ घावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. याबाबत लोहमार्ग पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रेखा राठोड यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.