नगरदेवळा येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0

पाचोरा :- तालुक्यातील नगरदेवळा येथे २५ वर्षीय तरुणाने दि २ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

नगरदेवळामधील पिंपळगाव रोडलगत जलकुंभाजवळ राहात असलेल्या भाड्याच्या घरात शाहरुख हैदर पिंजारी (वय – २५) याने सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी घरी कुणीही नव्हते. त्याचे मामा गुलाब किरण पिंजारी यांनी मयताची चौकशी केली असता त्यांना तो घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी तात्काळ नगरदेवळा पोलिसात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाचोरा ग्रामिण रुग्णालयात रवाना केला. त्याचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. मात्र आत्महत्येचे कारण अद्यापही समजु शकले नाही.

दरम्यान, पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल राजेश पाटील, विनोद पाटील, नरेंद्र विसपुते हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.