महापौर किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आल्याने खळबळ उडाली आले आहे. हे पत्र कुणी पाठवले आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे पत्र मुंबईबाहेरुन आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच हे पत्र मराठीत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

काय आहे पत्रात.. 

हे धमकीचं पत्र आल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिविगाळ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालुन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. माझ्या दादाकडे बघशील तर परिणाम वाईट होतील असे सांगत अश्लिल भाषेत धमकी देणारे हे पत्र महापौर निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे.

महापौर झाल्यापासून दुसऱ्यांदा धमकी गेल्यावर्षीही महापौर किशोरी पेडणेकर यांना फोनद्वारे धमकी आली होती. त्यावेळी सुद्धा धमकावणाऱ्याने किशोरी पेडणेकर यांंना जीवे मारण्याची धमकी दिली होती. महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुसऱ्यांदा धमकी आली आहे.

वरळीत झालेल्या सिलेंडर स्फोट दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात उपचारासाठी दिरंगाई झाल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच प्रकरणावरुन काही दिवसांपूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी असा एक शब्द उच्चारला होता ज्यामुळे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आणि त्यांनी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यावर गुरुवारी (9 डिसेंबर) आशिष शेलार हे पोलीस ठाण्यात पोहोचले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.