महापौरांच्या खुर्चीला हार घालून शिवसेनेचा ठिय्या!

0

जळगाव दि. 13-


घनकचरा व्यवस्थापन कर या शिर्षकाखाली घरगुती प्रयोजनार्थ 2 टक्के व वाणिज्य वापरासाठी 4 टक्के सेवा शुल्क करवाढ मागे घ्यावी या मागणीसाठी महानगरपालिकेत महापौराच्या दालनासमोर शिवसेनेतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. मात्र महापौरच न आल्यामुळे महापौरांच्या खुर्चीला हार घालून ठिय्या करण्यात आला.
यावेळी शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महापौर नगरसेवक राखी सोनवणे, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक अनंत जोशी, विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, भागचंद जैन,शबाना खाटीक, ज्योती तायडे, विष्णू भंगाळे, इब्राहिम पटेल, जयश्री महाजन, मनोज चौधरी,लता सोनवणे, नितीन बरडे, गणेश सोनवणे, प्रशांत नाईक, जिजाबाई कापसेंसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
महानगरपालिकेची 30 नोव्हेंबरची तहकूब सभा दि. 7 डिसेंबर रोजी घेण्यात आली. त्या सभेत विषय क्र. 6 अन्वये करवाढीला शिवसेनेने कडाडून विरोध केला होता मात्र सदर ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.
सध्या शहरात साफसफाईची स्थिती दयनिय आहे. साफसफाई चांगली व नियमित होत नाही. गटारी,नाले सफाई होत नाही, कचर्‍याचे ढिग साचले आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारची दर्जेदार सुविधा महापालिकेकडून पुरविली जात नसताना कराचा बोजा लादणे अनुचित आहे. शहरात विशेष साफसफाई कर 4 टक्के व हॉटेल, वाणिज्य प्रतिष्ठानसाठी विशेष साफसफाई कर 2 टक्के अतिरिक्त आकारणी केली जात आहे. असे असताना पुन्हा घनकचरा व्यवस्थापन कर लादणे हा अन्यायकारक आहे, सत्तेत असतानाही अंदाजपत्रकात 1 टक्का साफसफाई दरात वाढीच्या प्रस्तावाला विरोध केला होता, अशी भूमिका शिवसेनेतर्फे मांडण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.