महापालिका स्वीकृत सदस्य निवडीवरून शिवसैनिकांत असंतोषाचा भडका

0

इच्छुकांमध्ये विराज कावडियांचे नाव आघाडीवर

सेनानिष्ठे पेक्षा समाज आणि अर्थकारणाला महत्त्व दिल्याने असंतोष


जळगाव : (लोकशाही न्यूज नेटवर्क ) – प्रतिनिधी
जळगाव जिह्यात शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या नियुक्तीवरून उफाळून आलेली अंतर्गत गटबाजीचा वाद उफाळून आलाय. त्याची धुसफूस अद्याप चालूच आहे. जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेच्या एका स्वीकृत सदस्याच्या निवडीवरून कार्यकर्त्यांत धुभश्चक्री सुरू आहे. एका स्वीकृत सदस्यासाठी 16-17 शिवसैनिकांची रस्सीखेच सुरू आहे.

जळगाव महानगरपालिकेत शिवसेनेचे 15 नगरसेवक अडीच वर्षापूर्वी निवडून आले होते. एकूण 75 सदस्य असलेल्या महापालिकेत शिवसेनेचा एक नगरसेवक स्वीकृत सदस्य निवडून येतो. अडीच वर्षापूर्वी माजी नगरसेवक अमर जैन हे स्वीकृत सदस्य म्हणून निवडून आले होते. पूर्व नियोजना प्रमाणे त्यांनी एक महिन्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला  त्या रिक्त जागेवर शिवसेना आपला स्वीकृत सदस्य निवडणार आहे. त्यासाठी 16 ते 17 नगरसेवक त्या पदावर दावा करीत आहे. त्यात जुन्या निष्ठावान शिवसैनिकांचाही समावेश आहे. तर त्याचबरोबर नुकतेच काही वर्षांपूर्वी सेनेत आलेले पण सक्रिय असलेल्यानीही या पदावर दावा केला आहे. 

जोरदार रस्सीखेच सुरू असून आपल्या मर्जीतील नवख्या उमेदवारांच्या नावावर संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी शिक्कामोर्तब केल्याचे समजल्याने बाकी निष्ठावंत प्रथम पासून सेनेत असलेल्या शिवसैनिकांत असंतोष पसरला आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुखपदी जळगावचे विष्णू भंगाळे आणि पारोळ्याचे डॉ. हर्षल माने यांच्या नियुक्तीवरून वाद विकोपाला गेला आहे. पारोळ्याचे आ. चिमणराव पाटील हे कमालीचे नाराज झाले आहेत. चिमणराव पाटलांनी भाजपशी जवळीक साधण्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील शिवसैनिकात हा असंतोष धुमसत असतांनाच आता जळगाव महापालिका स्वीकृत सदस्य निवडीवरून तो वाद विकोपाला गेलाय. 

स्वीकृत सदस्यांची जागा एक आणि त्यासाठी 16-17 जण इच्छुक. त्यामुळे कोणाची तर एकाची निवड झाली तर बाकी सगळे नाराज होणार. नाराजांचा गट मोठा असल्याने त्याचा संघटनेवर विपरित परिणामाची शक्यता आहे. 

मिळालेल्या सूत्राच्या माहितीनुसार विराज कावडीया यांचे नाव आघाडीवर असल्याचे कळते. या आधीचे स्वीकृत सदस्य अमर जैन आणि विराज कावडीया हे एकाच जातीचे असल्याने त्यावरून वाद वाढला असल्याचे सांगण्यात येते. जिल्हा नियोजन मंडळावर माजी महापौर नितीन लढ्ढा आणि श्याम कोगटा हे देखील एकाच जातीचे आहेत. त्यामुळे मराठी शिवसैनिकांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याची भावना बळावली आहे. 

जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत हे जिल्ह्यातील शिवसैनिकातील गटबाजी वाढीला खतपाणी घालत असल्याचे दबक्या आवाजात बोललं जात आहे. स्वीकृत सदस्य निवडताना पक्षनिष्ठते बरोबर समाजातील प्रश्नांची जाण असलेला असणे अपेक्षित आहे. मात्र उलटे होत असल्याने असंतोष वाढत आहे. जात – धर्म विचार करत मराठी आणि जुन्या निष्टअवंतांना जाणीवपूर्वक बाजुला ठेवत वरिष्ठ पातळीवर आर्थिक व्यवहार झाल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र या बाबत अधिक माहिती काढली असता दुजोरा मिळू शकला नाही.

पालकमंत्री गुलाबराव पाटलांची जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या भूमिकेला मूकसंमती असल्याने शिवसैनिकांत असंतोष वाढत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.