महापालिका कर्मचार्‍यांचे 25 पर्यंत आंदोलन स्थगित

0

दिवसभर शहरातील 100 टन कचरा पडून

जळगाव, दि.19 –
महापालिकेच्या मुदत संपलेल्या 20 मार्केटमधील गाळे गाळे ताब्यात घेवून ई लिलाव तात्काळ लिलाव करुन कर्मचार्‍यांची देणी अदा करावी या मागणीसाठी महापालिका कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. यामुळे आज दिवभर सुमारे 100 टन कचरा उचलला न गेल्याने पडून होता. दरम्यान दुपारी साडेतीन वाजता जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त कीशोर राजे निंबाळकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी 24 एप्रिलपासून गाळे ताब्यात घेण्याची प्रकीया सुरु कऱण्याचे आश्‍वासन दिल्याने आंदोलन 25 एप्रिलपर्यंत स्थगित करुन कर्मचार्‍यांनी कामास सुरुवात केली.
महापालिका कर्मचार्यांचे गेल्या चार वर्षापासून वेतन, पेन्शन व महागाही भत्यांसह सुमारे 40 कोटी रुपये प्रशासनाकडे थकले आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचार्‍यांची देणी देणे शक्य नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या गाळ्यांच्या कोर्टाच्या आदेशानुसार लिलाव करुन त्यातून मिळणर्‍या उत्पन्नातून प्रशासनाने कर्मचार्‍यांची देणी अदा करावीत अशी मागणी महापालिकेच्या अखिल भारतीय सफाई मजदूर संघाने केली आहे. या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून कर्मचार्‍यांचे आंदोलन सुरु आहे.मागणी मान्य न झाल्याने कर्मचार्‍यांनी आजपासून बेमुदत आंदोलन सुरु केले होते.
जो पर्यंत मनपा प्रशासन गाळे ताब्यात घेवून लिलावाची कारवाई करत नाही तोवर कामबंद आंदोलन मागे घेण्यात येणार नाही अशी भूमिका मनपा कर्मचारी संघटनांनी घेतली होती.. गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सर्व कर्मचारी नियमित वेळेत मनपात दाखल झाले. मात्र, कोणत्याही विभागाचे कार्यालय न उघडता पार्किंगच्या आवारातच थांबून होते.
सर्व विभगांना ठोकले कुलूप ; घोषणाबाजी
कर्मचार्‍यांमध्ये महापालिकेच्या सर्व विभागांच्या शिपायांचा देखिल समावेश असल्याने कुठलाही विभाग उघडला गेला नाही. सर्व विभागांना कुलूप ठोकून शिपाई देखिल आंदोलनात सहभागी झाले होते. पालिकेसमोर बसलेले विभागप्रमुख, महीला व पुरुष कर्मचारी यांच्याकडून थकित देण्यांची मागणीसह प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरु होती.
आश्‍वासनानतंर आंदोलन 25 पर्यंत स्थगित
दुपारी प्रभारी आयुक्त कीशोर राजे निंबाळकर यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांच्याशी बोलतांना मुदत संपलेल्या 20 मार्केटमधील गाळे ताब्यात घेवून त्यांचा लिलाव करण्याची प्रकीया सूरु करणार असल्याचे सांगीतले. दि.23 एप्रिल रोजी गाळेप्रकरणी कोर्टात सुनावणी असल्याने त्यानतंर 24 एप्रिलपासून पक्रीया सूरु करणार असल्याचे सांगीतले. तसेच दि.1 मे पासून ते 7 मे दरम्यान कर्मचारी यांची थकीत देण्याचे मान्य केले. सर्वप्रथम सफाई कामगारांच्या थकीत वेतनास सुरुवात करीत असल्याचेही त्यांनी सांगीतले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. त्यावर आंदोलन मागे न घेता 25 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यास संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मान्यता दिली. 24 तारखेपर्यंत गाळे ताब्यात घेण्याची कारवाई सुरु न झाल्यास 25 एप्रिलपासून बेमुदत आंदोलन करु त्यावेळी पाणीपुरवठा विभाग देखिल यात सहभागी होईल असा इशारा आंदोलकांनी दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.