महात्मा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर गीतगायन कार्यक्रमात सभागृह मंत्रमुग्ध

0

जळगाव ;- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गुरूवार दिनांक 12 एप्रिल रोजी मेलडी गीतगायन ग्रुपच्या कलावंतांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून कबीर, गौतमबुध्द यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी विविध गीते सादर करून अवघे सभागृह मंत्रमुग्ध झाले.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेतर्फे महात्मा फुले – डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयती महोत्सवानिमित्त आज दिनांक 12 एप्रिल, 2018 रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात महात्मा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर गीतगायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरूप्रा.पी.पी.माहुलीकर हे होते. यावेळी प्रा.म.सु.पगारे, डॉ.बी.डी.कज्हाड, प्रा.जे.बी.नाईक, डॉ.अनिल चिकाटे, एस. आर. गोहील, ए.एस.कोळी आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा.माहुलीकर यांनी या भिमगीतांकडे मनोरंजन म्हणून न पाहता यातून बोध घेण्याचे आवाहन यावेळी केले.
मेलडी गीतगायन ग्रुपचे भालचंद्र सामुद्रे, सौ.संगीता सामुद्रे, चंद्रकांत इंगळे, कपील घुगे या गीतकारांनी माया पोरगा साहेब झाला, जगात गाजा वाजा भिमराव एकच राजा, भिमराज की बेटी मौ तो जयभीम वाली हँू, मना बाबा मुळे पोट भरतस वं लाजी लाजी जयभीम करतस वं, सुज्ञानाचा निर्मळ झरा भिमासारखा माणूस खरा, पौदा न होता ए मसिहा तो, वादळ वारा, परिश्रमान सुखाचा करून त्याग तुला भिमान बनावल वाघ , माझा समाज विकणार नाही, रथ समतेचा असा आणिला आदी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गीते सादर केली. यावेळी मेलडी सुपर हिट ऑर्केस्ट्राचे मोहन तायडे, सुरेश साळुंखे, दीपक तायडे, युवराज सोनवणे, नितीन शिरसाठ, सुनील तायडे, वीरेंद्र तायडे यांनी साथ- संगीतासाठी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश शिंदे, राजू सोनवणे, अरूण सपकाळे, तुषार पाटील आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार भालचंद्र सामुद्रे यांनी केले. उद्या दिनांक 13 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता दृकश्राव्य कक्षात रक्तदान शिबीर होणार असल्याची माहिती विचारधारा प्रशाळेच्या वतीने देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.