महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त श्रमसंस्कार निवासी शिबिर

0

गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रमलोकसहभागातून वनबंधाऱ्याचे करणार खोलीकरण

जळगाव दि.22 प्रतिनिधी :- गांधी रिसर्च फाउण्डेशन बाबापू-150 जयंतीवर्षनिमित्त ग्रामविकास प्रकल्पांतर्गत महात्मा गांधीजींच्या 72व्या पुण्यतीथी निमित्त चोपडा तालुक्यातील बोरअजंटी गावातील ग्रामस्थांच्या आवाहनास प्रतिसाद देत लोकसहभागातून वनबंधारा खोलीकरण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दि.25 ते 29 जानेवारी दरम्यान निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहेशिबिरात स्वयंप्रेरणेने सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

श्रमसंस्कार निवासी शिबिरामध्ये बोरअजंटीच्या ग्रामस्थांसह गांधी रिसर्च फाउण्डेशनचे स्वयंसेवकमहात्मा गांधीजींच्या विचारधारेतील समाजकार्य पीजीडिप्लोमातील विद्यार्थीभगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयआदिवासी सेवा मंडळ संचलित आश्रमशाळा बोरअजंटी येथील विद्यार्थीबोरअजंटी गावातील ग्रामस्थ व युवाशक्ती श्रमदानात सहभागी होणार आहेतया उपक्रमास वनविभाग परिक्षेत्र बोरअजंटीपशुचिकित्सा केंद्रातील सहकारी सहभागी होणार आहेतया प्रकल्पासाठी तांत्रिक मार्गदर्शनासह विशेष सहकार्य व परिश्रम जैन इरिगेशन सिस्टिमचे इंजिनियर व सर्वेअर टिम ने घेतले आहेत.

लाखो लिटर पाणी जिरवले जाणार

बोरअजंटी वनबंधाऱ्याचे खोलीकरण केल्यानंतर गाव शिवारात 9.90 लाख लिटरपेक्षा जास्त पाणी अडविले जावून लाखो लिटर पाणीसुद्धा जिरवले जाणार आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा‘ उपक्रमात या नाल्यावर श्रमदानातून मातीचा बांध बांधून ग्रामस्थ पाणी अडविण्याची क्षमता वाढणार आहेया उपक्रमातून गावाचा पाणी प्रश्न बऱ्याचअंशी सोडविला जाणार आहे.

लोकसहभागासाठी आवाहन

या उपक्रमात स्वेच्छेने सहभागी होण्यासाठी विशेष आवाहन करण्यात येत आहे की, ‘सर्व साथीसोबत मिळून छोट्याछोट्या उपक्रमांतून क्रांती घडवू या.’ जेसीबीट्रॅक्टरसारख्या यंत्रांच्या मदतीचीश्रमदान करु इच्छिणाऱ्या साथींचीइंधनासाठी व इतर स्वरुपातील मदतीचे आवाहन केले आहेयासाठी सागर चौधरी (9960488175), चंद्रकांत (8329863501) सुधीर पाटील (9823362330) यांच्याशी संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.