महागाईचा भडका.. गॅसदर आणि भाज्यांचे दर भिडले गगनाला (व्हिडीओ)

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिवसेंदिवस महागाई वाढतच असल्याने सामान्य नागरिक बेजार झाले आहेत. इंधन दरवाढी बरोबरच गॅस आणि भाजीपाल्याचे दर वाढल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहेत. ऐन दिवाळीच्या सणावर भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अवकाळी पाऊस आणि आवक घटल्याने थेट परिणाम भाजीपाल्यावर झाला आहे. जर भाज्या इतक्या महाग झाल्या तर खायचं काय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात भाज्यांच्या दरात कमालीची वाढ होताना दिसत आहे. देशात पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या किंमतीनंतर आता भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईनं सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचा दर शंभरी पार झाला असून भाज्यांच्या दरानेही मजल मारली आहे.  टोमॅटोचा दर ५० रु. ते ९३ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. तर कोथिंबीर जुडी सुद्धा १०० रू. वर पोहोचली आहे.

दरवाढीचं कारण 

अवकाळी पावसामुळे शेतीचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे माल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी बंधू आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. टोमॅटोचं नवं पीक आता दोन ते तीन महिन्यांनंतर उपलब्ध होणार आहे. त्यानंतरच टोमॅटोच्या दरात घट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चीननंतर भारत जगभरातील दुसरा सर्वाधिक टोमॅटो उत्पादक देश आहे.

माल वाहतुकीवर मोठा परिणाम

कांदा प्रति किलो ६०-८० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. अवकाळी पावसामुळे शेतीचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे माल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी बंधू आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.

 अशाप्रकारे सर्व भाज्यांचे दर वाढले  आहेत.  याविषयी भाजीपाला विक्रेते आणि गृहिणी यांच्यासोबत लोकशाहीच्या लोकलाईव्ह टीमने संवाद साधत प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.