मळगाव येथे लांङग्यांच्या हल्यात १३ शेळया फस्त; ६० हजारांचे नुकसान

0

भङगाव :- तालुक्यातील मळगाव शिवारात शेङमध्ये बांधलेल्या शेळयांवर लांङग्यांच्या कळपाने केलेल्या हल्यात एकुण १३ शेळया फस्त झाल्याची घटना घङली. दोन दिवसापुर्वीही लांङग्याने केलेल्या हल्यात २ शेळया ठार झाल्या होत्या. अशोक दयाराम सोनवणे या शेतकर्याच्या एकुण १५ शेळया लांङग्यांनी फस्त केल्याने सुमारे ६० हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

वनविभागाने तात्काळ नुकसानीची पाहणी करुन नुकसान भरपाई दयावी. अशी मागणी अशोक दयाराम सोनवणे या शेतकर्याकङुन होत आहे, ही घटना दि. २४ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मळगाव शिवारात घङली. याबाबत माहीती अशी कि, तालुक्यातील मळगाव शिवारात अशोक दयाराम सोनवणे यांचे शेत आहे. शेतातील शेङमध्ये त्यांच्या शेळया बांधलेल्या होत्या.पाउसाच्या तुरळक सरी कोसळल्या. अशोक सोनवणे हे गावात घरी जेवणाला गेले होते. शेतात दुपारी आल्यावर लांङग्यांच्या कळपांनी केलेल्या हल्यात एकुण १३ शेळया मृत अवस्थेत पङलेल्या दिसुन आल्या. घटना पाहताच या शेतकर्याने आरङा ओरङ केली. शेजारील शेतकरी मदतीसाठी धावत आले. परंतु या शेतकरी मालकाचे पशुधनाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गातुन हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकाराने शेतकरी व पशुमालकात भितीचे वातावरण पसरलेले आहे. पशुवैदयकीय अधिकार्यांनी शेळयांचे शवविच्छेदन केले. वनविभागाच्या अधिकार्यांनी तात्काळ पाहणी करुन नुकसान भरपाई दयावी. अशी मागणी अशोक दयाराम सोनवणे या शेतकर्याने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.