एरंडोल येथे स्मार्ट कार्डसाठी लांबच लांब रांगा

0

एरंडोल :- येथे बस स्थानकावर ५ जून २०१९ पासून स्मार्ट कार्ड नोंदणीचे काम सुरु असून आता पर्यंत ६०४ ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी झालेली आहे. विशेष म्हणजे एकाच संगणकावर महिला व पुरुषांच्या नोंदणीचे काम सुरु असल्यामुळे लांबच लांब रांगा दिसून येतात. अक्षरशः ज्येष्ठ नागरिक हैराण होऊन खाली बसतात. दरम्यान महिलांसाठी एक संगणक व पुरुषांसाठी दुसऱ्या संगणकाची सुविधा देऊन नोंदणीचे कामाला गती देणे आवश्यक आहे. वृद्धाचे हाल थांबवावी अशी मागणी जोर धरत आहेत.

भल्यापहाटे ५ वाजेपासून लवकरच नोंदणी व्हावी म्हणून काही ज्येष्ठ नागरिक नंबर लावण्याकरिता बस स्थानकावर हजेरी लावतात. सकाळी ९ वा. पासून ते सायंकाळी ४ वा. पर्यंत नोंदणी केली जाते. त्यानंतर रांगेत उभ्या असलेल्या लोकांची नावे लिहून घेतली जातात व दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा बस स्थानकावर यावे लागते . एकाच दिवशी नोंदणीचे काम व्हावे अशी मागणी आहे.

विशेष हे की संपूर्ण तालुक्यातूनच नव्हे तर बस स्थानकावर बाहेरून आलेले प्रवासी सुद्धा नोंदणीसाठी रांगेत उभे राहतात . ज्येष्ठ नागरिक नोंदणीसाठी बस स्थानकावर येतात तासंनतास रांगेत उभे राहवे लागत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हालअपेष्ठा सहन कराव्या लागतात.

एका दिवसाला ५० ते ६० जणांची नोंदणी केली जाते.एरंडोल बस स्थानकावर विलास पाटील ( वाहक ) हे संगणकावर नोंदणीचे काम पाहतात. दरम्यान आगर व्यवस्थापक विजय पाटील यांनी स्मार्ट कार्ड योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.