मराठा आरक्षणाची स्थिती सरकारच्या गोंधळामुळे – देवेंद्र फडणवीस

0

मुंबईः मराठा आरक्षणाचा मुद्दा आता आणखीनच तापणार अशा वळणावर आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर अंतिम सुनावणी आजपासून सुरू होणार होती. मात्र, न्यायालयानं आज सुनावणीला स्थगिती दिली. आता प्रकरणावर ५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं २५ जानेवारीपासून अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आज (२० जानेवारी) हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात आलं होतं. यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या घोळामुळे मराठा आरक्षण अडचणीत येत असल्याचं फडणवीस म्हणाले. तसेच सरकार प्रत्येक सुनावणीत वेगळी भूमिका मांडत असल्याने संभ्रम निर्माण होत असल्याचं फडणवीस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.